शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

शिवसेना-विदर्भवाद्यांमध्ये राडा, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:12 IST

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर आयोजित चर्चासत्रात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घातला.

नागपूर : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर आयोजित चर्चासत्रात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घातला. शिवसेनेचे कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत असताना विदर्भवाद्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे वातावरण तापले व हमरीतुमरीपर्यंत वेळ आली. तापलेले वातावरण लक्षात घेता राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनी लिहिलेल्या ‘महाराष्ट्र मॅक्सिमस : द स्टेट, इट्स सोसायटी अ‍ॅन्ड पॉलिटिक्स’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यात शिवसेना खा. आनंद अडसूळ, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे, माजी खासदार विजय दर्डा, अ‍ॅड. श्रीहरी अणे,‘वनराई’चे विश्वस्त गिरीश गांधी, साहित्यिक वि. स.जोग हे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वेगळ्या विदर्भाची चर्चा कल्पनाविलास आहे का, या मुद्यावर अ‍ॅड.अणे यांचे मत विचारण्यात आले. अ‍ॅड. अणे यांनी याचे उत्तर तर येथे उपस्थित विदर्भवादीच आपले हात वर करून देतील, असे म्हटले.यावर सभागृहात उपस्थित शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सर्व कार्यकर्ते अ‍ॅड. अणे यांच्यासमोर एकत्र झाले व संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करायला लागले.यावेळी विदर्भवादी कार्यकर्ते अणे यांच्या समर्थनार्थ समोर आले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरश: धक्काबुक्कीदेखील सुरू झाली. सातत्याने २ ते ३ वेळा असा प्रकार झाला. अखेर खा. आनंद अडसूळ हे आपली भूमिका मांडायला उभे झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शांत झाले.विदर्भवाद्यांवर अडसूळ यांची टीकाखा. अडसूळ यांनी विदर्भवाद्यांवर टीका केली. हा चर्चासत्राचा कार्यक्रम होता. मात्र अ‍ॅड. अणे यांनी जाणुनबुजून वेगळ्या विदर्भाच्या बाजूने लोक आहेत, असे म्हणून वादाला सुरुवात केली. चर्चासत्रादरम्यान दुसऱ्या बाजूची मते ऐकण्याची त्यांची मानसिकताच नाही. मोजक्या लोकांच्या भावनांना ते सर्व जनतेच्या भावना कशा सांगतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.अणेंचा सवाल, राज्यात कशाला राहायचे ?यासंदर्भात अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असतामत मांडू न देण्यासाठीच हा गोंधळ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही वेगळ्या विदर्भाबाबत मत मांडले की लोकांना त्रास होतो. अशा राज्यामध्ये राहण्याचा अर्थ काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा गोंधळ नियोजित होता व अमरावतीहून भाडोत्री माणसे बोलविण्यात आली होती, असाआरोप त्यांनी केला.

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिन