शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र वायकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- संजय निरुपम

By admin | Updated: June 23, 2016 21:31 IST

शिवसेना आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत आरे कॉलनीतील २० एकर जमीन ताब्यात घेतली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 23 - शिवसेना आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत आरे कॉलनीतील २० एकर जमीन ताब्यात घेतली असून व्यायामशाळेच्या नावाखाली अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे वायकर यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी आणि आरे कॉलनीतून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. रवींद्र वायकर यांना आदिवासींसाठी व्यायामशाळा काढण्यासाठी ३५० मीटर जागा मंजूर झाली असताना त्यांनी लगतच्या २० एकर जमिनीवर अनधिकृत ताबा मिळविला आहे. तसेच व्यायामसाळेवर अनधिकृतपणे पहिला मजला चढविला आहे. आरे प्रशासनाने याबाबत वारंवार म्हाडाशी पत्रव्यवहार करुन कारवाईची मागणी केली आहे. मात्र, म्हाडाचा कारभारच वायकरांकडे असल्याने कारवाई होत नाही. वायकर यांनी या आरोपांबाबत खुलासा करताना व्यायामशाळेसाठी ४ गुंठे जागा मंजूर झाला असून त्यानुसारच बांधकाम करण्यात आला आहे. शिवाय शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्था नोंदणीकृत असल्याचा दावा केला आहे. मात्र, सदर संस्थेची नोंदणी झाली नसल्याची माहिती धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे या संस्थेच्या नोंदणीचे पुरावेच वायकरांनीच जाहिर करावेत. आरे ने ८ मार्च २०१५ रोजी म्हाडाला पत्र लिहिले होते. यात व्यायामशाळेवर अनधिकृतपणे एका मजल्याचे बांधकाम करण्यात आले असून त्यावर त्वरित कारवाई करण्यास सांगण्यात आले होते. परंतु वायकर यांनी मंत्री पदाचा दुरुपयोग करून त्या अनधिकृत बांधकामावर आजपर्यंत कारवाई केली नाही. आरेच्या पत्रावर वायकर गप्प का ? अनधिकृत बांधकाम का पाडले गेले नाही, याचा खुलासाही वायकर यांनी करावा, असे आव्हान निरुपम यांनी दिले.