शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

प्रश्न, प्रश्न आणि नुसते प्रश्नच!

By admin | Updated: December 20, 2015 00:17 IST

हिवाळी अधिवेशनाचे दोन आठवडे संपले. येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारी आणखी तीन दिवसाचे काम झाले की, कायदेशीररीत्या विदर्भात तीन आठवड्यांचे अधिवेशन घेतले, असे सांगायला

- अतुल कुलकर्णी(अधिवेशन डायरी)नागपूर - हिवाळी अधिवेशनाचे दोन आठवडे संपले. येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारी आणखी तीन दिवसाचे काम झाले की, कायदेशीररीत्या विदर्भात तीन आठवड्यांचे अधिवेशन घेतले, असे सांगायला सरकार मोकळे झाले. मात्र, या अधिवेशनाने विदर्भाला खरेच काही मिळाले का? कोणते असे प्रश्न होते की, जे केवळ आणि केवळ अधिवेशनामुळेच सुटले? या भागातल्या जनतेला या अधिवेशनातल्या अशा कोणत्या निर्णयामुळे १०० टक्के न्याय मिळाला? विरोधकांनी कोणता असा विषय लावून धरला की, ज्यामुळे राज्यातल्या जनतेला न्याय मिळवून देता आला? सत्ताधाऱ्यांंनी कोणता असा विषय मांडला, ज्यामुळे सरकारला विधायक निर्णय घेता आला? आणि असा कोणता विषय होता, ज्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि पुढील काही वर्षे तरी लक्षात राहण्याजोगी भाषणे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी केली?यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर या दोन आठवड्यांत मिळालेले नाही, मिळणारही नाही. हिवाळी अधिवेशन कव्हर करण्यासाठी आलेल्या पत्रकारांनाही काही प्रश्न पडले होते. नियम २९३ द्वारे एकाच दिवशी, एकाच विषयावर सत्ताधारी आणि विरोधकांनी दिलेली चर्चा कशी काय लागू शकते? विरोधकांनी दिलेल्या प्रस्तावात विरोधकांना न विचारता काटछाट होते का? आपल्या हक्कावर आणि कामकाज करण्याच्या पद्धतीवर सरकार गदा आणते आहे, याचा कसलाही जाब न विचारता, विरोधकांनी कामकाज कसे काय चालू ठेवले? ज्याने कोणी ही अक्षम्य चूक केली त्याचे नाव सांगा किंवा त्याला शिक्षा झाल्याशिवाय अधिवेशन पुढे चालूच देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी का घेतली नाही? नारायण राणे विरोधी पक्षनेते असते आणि असे काही घडले असते, तर राणेंनी सभागृह डोक्यावर घेतले असते. सरकारला घाम फोडला असता, अशी चर्चा विधानभवनात रंगली हे विद्यमान विरोधकांसाठी चांगले की वाईट...?वारंवार झालेल्या चर्चेची पुनरुक्ती नको, म्हणून काही काटछाट झाली असेल. एका प्रस्तावावर दोन किंवा तीन विभागाच्या मंत्र्यांपेक्षा जास्त मंत्री नसावेत, असेही कारण त्यामागे असेल, असे सभागृहात अध्यक्षांनी सांगितले आणि दुसऱ्या दिवशीच्या कामकाजात विरोधकांचा मूळ प्रस्ताव जशास तसा, कोणतीही काटछाट न होता, पुन्हा कसा काय लागला? नुसतेच प्रश्न, हाती काहीही नाही. ना विदर्भाच्या जनतेला काही मिळाले, ना राज्यातील शेतकऱ्यांना... वर्षानुवर्षे चर्चेला आलेला मुद्दा याहीवेळी पुन्हा आला, ही असली नाटके करण्यापेक्षा, कोट्यवधींचा खर्च वाया घालवण्यापेक्षा, विदर्भाला अधिवेशन भत्ता म्हणून दरवर्षी दोन अडीचशे कोटी रुपये दिले, तर त्यातून दिसण्यासारखी काही कामे तरी होतील. नागपूरात फिरताना एकाने फार छान फलीत सांगितले. अधिवेशनाचे फायदे काय, यावर तो म्हणाला, ‘मंडप, बांबूवाल्यांना काम भेटते, केटरर्सची चलती होते, कोंबड्या, बकऱ्यांचे दिवस भरतात, हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, गाड्या, पेट्रोलपंप अशांचा गल्ला खुळखुळतो. पानाचे ठेले भरात येतात, भाव नसलेल्या संत्र्यांना ज्यूसपुरता भाव येतो. परत जाताना लोक संत्रा बर्फी, खव्याच्या पोळ्या घेऊन जातात, कोणी जंगलांमधला मध नेतो, तर कोणी वाघ, वाघीण पाहून सुखावतो. खर्रा बनविणाऱ्याच्या हातालाही वेग येतो... एका अधिवेनाने आणखी काय-काय द्यायला हवे... फार अपेक्षा करू नका बरं भाऊ!’