शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: May 30, 2016 01:21 IST

महापौर प्रशांत जगताप यांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने शहरामध्ये झालेल्या खोदाईची तपासणीत कुठेच बेकायदेशीर खोदाई आढळून आली नाही

पुणे : महापौर प्रशांत जगताप यांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने शहरामध्ये झालेल्या खोदाईची तपासणीत कुठेच बेकायदेशीर खोदाई आढळून आली नाही. मात्र, बेकायदेशीर खोदाई झाल्याचे नागरिकांकडून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले जात असल्याने महापालिकेने केलेल्या तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरामध्ये नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते, फुटपाथ उखडून खोदाई होत असल्याचे अनेक प्रकार उजेडात आल्यानंतर महापौरांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या सर्व खोदाईची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनास दिले होते.पथ विभागातील अधिकाऱ्यांनी शहरात झालेल्या सर्व खोदाईची तपासणी केली, त्यामध्ये त्यांना कुठेही बेकायदेशीर खोदाई झाल्याचे आढळून आले नाही. त्याबाबतचा अहवालही त्यांनी महापौरांकडे सादर केला. मात्र, अनेक ठिकाणी बेकायदा खोदाई झाल्याचे नागरिकांकडून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले जात आहे.महापालिकेची मोठी यंत्रणा दिमतीला असलेल्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून कुठेच बेकायदेशीर खोदाई आढळून येत नाही. त्याचवेळी नागरिकांकडून बेकायदेशीर खोदाई झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून खरंच तपासणी केली आहे का, किंवा तपासणी करून बेकायदेशीर प्रकार लपविले गेले का, असे प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. खोदाईची कामे वेगाने मार्गी लागावीत यासाठी मोबाइल कंपन्यांकडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचे प्रकार उजेडात आले आहेत. बेकायदेशीर खोदाईला विरोध करणाऱ्या महापालिकेतील एका अतिरिक्त आयुक्तांची बदली मोबाइल कंपनीच्या दबावातून झाल्याचा प्रकारही उजेडात आला आहे.स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलवडगावशेरीतील नागरिक श्रीधर गलांडे यांनी खराडी बायपास ते मुंढवा रस्त्यादरम्यान खोदाई केली असल्याची तक्रार पथ विभागाकडे केली. या तक्रारीची तपासणी केल्यानंतर बेकायदेशीरपणे खोदाई झाल्याचे समोर आले आहे. आता पथ विभागाकडून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर सहकारनगर परिसरात मोबाइल कंपन्यांकडून परवानगी घेतल्यापेक्षा जास्त खोदाई झाल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते ऋषीकेश बालगुडे यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार संबंधितांविरूद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशा अनेक तक्रारी पथ विभागाकडे आल्या आहेत.