शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

वेसावे खाडीपुलाचा प्रश्न सुटणार

By admin | Updated: April 7, 2017 02:06 IST

वेसावे-मढ खाडीवर पूल उभारण्यासाठी वेसाव्याच्या शिवकर समाज आणि मढ ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

मनोहर कुंभेजकर,मुंबई- गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या वेसावे-मढ खाडीवर पूल उभारण्यासाठी वेसाव्याच्या शिवकर समाज आणि मढ ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. या खाडीवर पूल उभारल्यास मढवासीयांचा १४ कि.मी.चा फेरा वाचणार आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायाला गती मिळणार असून, इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मढवासीयांना शैक्षणिक आणि आरोग्य सुविधाही जवळ येणार आहे.सध्या या मार्गावर दर १० मिनिटांच्या अंतराने सकाळी ५ ते मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत फेरीबोट सेवा सुरू आहे. सुमारे ५ ते ६ हजार नागरिक त्यातून प्रवास करतात. मढ-वेसावे खाडीवर पूल नसल्यामुळे मढवासीयांना मालाड पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी १४ कि.मी.चा लांबचा पल्ला पडतो. मढवासीयांचा प्रामुख्याने मासेमारी व्यवसाय असल्यामुळे मासेमारीसाठी लागणाऱ्या बर्फासह मासे विक्रीसाठी लांबच्या पल्ल्यामुळे इंधन आणि वेळेचाही अपव्यय होतो. मढवासीयांना शाळा, महाविद्यालय, सरकारी रुग्णालय सर्वच लांब असल्याने त्यांना १४ किमीपर्यंत शिक्षणासाठी आणि आरोग्यसेवेसाठी मालाडला जावे लागते. त्यामुळे या मार्गावर पूल उभारणे गरजेचे असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे मुंबई अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली. नागरिकांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरसेविका संगीता सुतार आणि मढच्या कार्यकर्त्यांसह मढ-वेसावा खाडीपुलाला विरोध करणारे वेसावा येथील शिवकर कोळी समाजाचे अध्यक्ष प्रवीण भानजी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक बुधवारी पार पडली. या वेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे किरण कोळी यांनी सांगितले. विकासाला विरोध नाही, मात्र पुलाचा रस्ता समाजाची बोटी शाकारण्याची जागा असलेल्या शिवकर समाजाच्या मालकीच्या जागेतून जात असल्याचे भानजी यांनी सांगितले. त्यामुळे मालकी हक्काच्या जागेवर गदा न आणता प्रस्तावित रस्ता सरकारी जागेत हलवावा, अशी मागणी त्यांनी केली.पालिकेच्या मुख्य अभियंत्यांनी पुलाच्या जागेची पाहणी केली होती. त्या वेळी कोणाचेही नुकसान न होता पूल उभारावा अशी मागणी स्थानिकांनी केली होती. या पुलाच्या उभारणीसाठी पालिका आणि मंत्रालय स्तरावर चर्चा सुरू असून, पुलाची जागा बदलली असून, सर्व्हे झाल्याशिवाय जागेत बदल झाला की नाही हे माहीत होणार नाही, अशी भूमिका अनिल भोपी यांनी मांडली.>शिवकर समाजाने सहकार्य करावे!शिवकर समाजाची बोटी शाकारण्याची जागा आणि मासेमारी व्यवसाय यांना धोका होता कामा नये, याची काळजी घेतली जाईल. प्रकल्पाच्या उत्तरेला जागा हलवल्यास सीआरझेडची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर पुलाखालची जागा मत्स्यव्यवयासाठी शिवकर समाजाला मिळण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी भूमिका किरण कोळी यांनी घेतली. त्यामुळे शिवकर समाजाने प्रकल्पात सहकार्य करण्याची मागणी त्यांनी शेवटी केली.