शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By admin | Updated: October 18, 2016 01:00 IST

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सर्वांदेखत पसार होण्याची घटना सोमवारी घडल्याने न्यायालयातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला

पुणे : न्यायालयाच्या आवारातून लहान-मोठ्या चोरीचे गुन्हे नेहमीच होत असतात़ येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलीस बंदोबस्त असतानाही खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सर्वांदेखत पसार होण्याची घटना सोमवारी घडल्याने न्यायालयातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़ या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही बसवणे, आरोपींच्या सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगचा प्रभावी वापर होणे आणि उच्च न्यायालयाप्रमाणे सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी आहे. महिला वकिलांच्या कक्षातून वकील महिलेची पर्स चोरीला गेली होती. त्यानंतर प्रत्यक्ष न्यायालयाच्या खोलीतूनच फाईल चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आवारात लावलेल्या एका वकिलाच्या गाडीतून रोकड चोरीला गेली होती. गेल्या वर्षी एका न्यायालयाच्या रूमला आग लागून शेकडो फाईलींची होळी झाली होती. त्यामुळे अनेक पक्षकारांना त्याचा फटका बसला होता. न्यायालयातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे. न्यायालयात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी पुणे बार असोसिएशनने काही वर्षांपूर्वी केली आहे. कारागृहातून सुमारे दोनशे आरोपींना सुनावणीसाठी हजर केले जाते. त्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे केल्यास पोलिसांवरील ताण कमी होऊन, वेळ आणि सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होणार नाही, अशी मागणी वकिलांकडून होत आहे़न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेसाठी मंजूर पोलीस दलापेक्षा कमी संख्या आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, कर्मचारी अशा सुमारे १२६ पदांची मंजुरी आहे. मात्र, न्यायालयात केवळ सुमारे ५५ ते ६० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यामुळे सुरक्षेचा ताण त्यांच्यावर पडत आहे. (प्रतिनिधी)>न्यायालयात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी बार असोसिएशनतर्फे करण्यात आली. मात्र, त्यादृष्टीने पावले उचलली गेली नाहीत. संपूर्ण न्यायालयात सीसीटीव्ही बसवण्यात यावेत. त्यामुळे अशा घटनांना आळा बसू शकेल़ उच्च न्यायालयात सुरक्षा व्यवस्था कडक आहे. तेथे स्कॅनर मशीन आहेत. इतर सुरक्षेच्या उपाययोजना आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा न्यायालयातही या गोष्टी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. - अ‍ॅड़ मिलिंद पवार, माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन