शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पूल खचला तरी पीडब्ल्यूडी झोपेतच!

By admin | Updated: November 10, 2014 04:16 IST

आपेगाव व गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्रीचा २००२ मध्ये बांधलेला पूल खचण्यामागे केवळ वाळू उपसा हेच एकमेव कारण असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले

संजय जाधव, पैठणआपेगाव व गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्रीचा २००२ मध्ये बांधलेला पूल खचण्यामागे केवळ वाळू उपसा हेच एकमेव कारण असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पुलाच्या पायाखाली बेसुमार वाळू उपसा होत असताना या विभागाने महसूल किंवा पोलीस खात्याला साधे पत्र लिहून हे थांबविण्याबाबत कळविलेले नाही. यामुळे वाळू उपशाला महसूल, पोलीस आणि आता बांधकाम विभागाचेही अभय होते, असे उघड झाले आहे. शनिवारी पैठण तालुक्यातील आपेगाव व गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री या दोन गावांना जोडणारा २९० मीटर लांबीचा गोदावरी नदीवरील पूल अचानक खचला होता. यानंतर गावकऱ्यांनी वेळीच वाहतूक बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली. रविवारी संध्याकाळी सात वाजता अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यू. के. आहेर, उपविभागीय अभियंता शेगोकार, शाखा अभियंता बी.बी. जायभाये आदींनी भेट देऊन पाहणी केली. तसेच आपेगाव-कुरणपिंप्री पुलाची तपासणी करण्यासाठी सोमवार १० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तज्ज्ञ पथक येणार असल्याचे उपविभागीय अभियंता एन.बी. चौरे यांनी सांगितले. पुलावरील वाहतूक दुसऱ्या दिवशीही बंद होती. वाहतुकीच्या पर्यायी व्यवस्थेबाबत वरिष्ठ स्तरावर सोमवारी निर्णय घेण्यात येईल, असेही चौरे म्हणाले. या प्रकारामुळे प्रशासनातील लालफितीचा कारभारच चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.