शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचारी संपाच्या पवित्र्यात

By admin | Updated: April 8, 2017 05:24 IST

राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी लवकरच शासकीय कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता निर्माण झाली

मुंबई : राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी लवकरच शासकीय कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवार, ८ एप्रिल रोजी ठाणे येथील विश्रामगृहामध्ये दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली आहे. महासंघाचे सरचिटणीस सूर्यकांत इंगळे यांनी सांगितले की, या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागामधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होईल. या दोन्ही विभागांतील लिपिक संवर्गातील पदनाम बदलणे, रूपांतरित कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणे, त्यांच्या वेतनश्रेणीतील तफावत दूर करणे, प्रस्तावित आकृतीबंध रद्द करणे अशा विविध समस्यांवर सरकारला नमवण्याचे मार्ग चर्चेतून काढले जातील. सरकारकडून सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागातील पदांमध्ये कपात करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. या संदर्भात महासंघाने २१ मार्च रोजी आझाद मैदानात धरणे दिले होते. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांची भेटही घेण्यात आली. मात्र, ठोस निर्णय हाती न आल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)>महासंघाच्या मागण्यापदांचा सुधारित आकृतीबंध त्वरित मागे घ्यावा. रिक्त पदे नष्ट न करता तत्काळ भरावीत.पदे कमी न करता, केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग जशास तसा लागू करावा. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी.