शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

पुण्याची पराभवाची मालिका कायम

By admin | Updated: August 13, 2014 02:35 IST

पुणे संघाच्या प्रवीण नेवाळे आणि वजीर सिंग यांनी आपल्या नावाला साजेसा खेळ केला, परंतु तेलगु टायटन्सविरुद्ध ते पराभव टाळू शकले नाहीत

पुणे : पुणे संघाच्या प्रवीण नेवाळे आणि वजीर सिंग यांनी आपल्या नावाला साजेसा खेळ केला, परंतु तेलगु टायटन्सविरुद्ध ते पराभव टाळू शकले नाहीत. तेलगु संघाने मध्यांतरानंतर आक्रमक खेळ करीत प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा ४२-३६ गुणांनी पराभव केला. तेलगुचा सुकेश हेगडे सामन्याचा मानकरी ठरला. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये मंगळवारी या स्पर्धेला पुणेकरांसह रत्नागिरी, सोलापूर, अहमदनगर, नाशिक येथूनसुद्धा कबड्डीप्रेमींनी हजेरी लावत पुणे संघाला जोरदार प्रोत्साहन दिले. आजचा खरा सामना झाला तो पुण्याचा वजीर सिंंग आणि तेलगुच्या राहुल चौधरी यांच्यात. दोघांनीही सुरुवातीला बचावात्मक खेळ करीत बोनस गुण मिळविण्यावर भर दिला. पुणे संघाला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत असतानासुद्धा नेवाळे व वजीरच्या व्यतिरिक्त सूर गवसत नव्हता. त्यातच तेलगु संघाचे खेळाडू शांत व नियोजनपूर्वक खेळत होते. त्यांचा बचावसुद्धा भक्कम होता. पाचव्या मिनिटाला पुणे संघावर लोन बसण्याची वेळ आली होती. पण नेवाळे व वजीरने केलेल्या आक्रमक व खोलवर चढायांमुळे पुणे संघाने चोख उत्तर देत त्यांच्यावर लोन चढविला. नेवाळेने आपल्या चढाईत तीन गुण मिळविले. या लोनचा फायदा मात्र पुणे संघाला उचलता आला नाही. लोन बसल्यामुळे चवताळलेल्या तेलगु संघाच्या खेळाडूंनी जास्त आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. त्याचा त्यांना चार मिनिटांत फायदा झाला. त्यांनी लोन फोडून टाकला. विश्रांतीला खेळ थांबला तेव्हा पुणे संघाकडे २७-२५ अशी आघाडी होती.