शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

By admin | Updated: July 7, 2016 17:33 IST

शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणसाखळी मधील पाणलोट क्षेत्रात गुरूवारी पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, दिवसभरात अधून मधून तुरळक पावसांच्या सरींनी हजेरी लावल्याची

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ७  : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणसाखळी मधील पाणलोट क्षेत्रात गुरूवारी पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, दिवसभरात अधून मधून तुरळक पावसांच्या सरींनी हजेरी लावल्याची पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसाने खडकवासला, पानशेत, वरसगाव तसेच टेमघर धरणांचा पाणीसाठा साडे सहा टीएमसीवर पोहचला असून पुणेकरांवर ओढावले वाढीव पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले आहे. या चारही धरणांचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर पोहचला आहे. शनिवार (दि,२) पासून पुणे शहरा बरोबरच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला होता. बुधवार (दि.६) पर्यंत हा पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे तळ गाठलेल्या या चारही धरणांच्या पाणी पातळी मध्ये लक्षणीय वाढ होण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान, बुधवारी रात्री पासूनच पावसाचा जोर ओसरल्याने पाणीसाठयात होणा-या वाढीचा वेगही मंदावलेला असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण़्यात आले.=========कोकणातील पावसाचा आधार या चारही धरणांमधील पावसाचा जोर ओसरला तरी कोकण घाटमाथ्यावर होणा-या पावसाचे पाणी मोसे खो-यातून पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात येत आहे. त्यातच लवासा मध्ये असलेली धरणेही ओव्हरफूल झाल्याने या ठिकाणी होणा-या पावसाचे पाणीही धरणांमध्ये येत आहे. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतली तरी पाणीसाठा वाढण्यास कोकणातील पावसाचा आधार मिळत असल्याचे चित्र सध्या धरणक्षेत्रात दिसून येत आहे.==============