शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनासाठी पुणे पॅटर्नचा अवलंब व्हावा

By admin | Updated: September 5, 2016 03:28 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारच्या जलप्रदूषण रोखण्यासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचनांंना मीरा-भार्इंदर महापालिकेने तिलांजली दिली

मीरा रोड : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारच्या जलप्रदूषण रोखण्यासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचनांंना मीरा-भार्इंदर महापालिकेने तिलांजली दिली होती. मात्र, आता गणेश चतुर्थीच्या आधी नागरिकांना पुणे पॅटर्नप्रमाणे बादलीत गणेशमूर्ती विसर्जनाचे आवाहन केले आहे. याबाबतच्या बैठकीस नगरसेवकांनाही डावलण्यात आले. याबाबत नगरसेवकांनी लेखी तक्रार केली आहे. मीरा - भार्इंदरमध्ये महापालिकेकडून सार्वजनिक तलाव, खाडी, नदी व समुद्रकिनारी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली जाते. हजारो लहानमोठ्या मूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने जलप्रदूषण होते. तलावातील गाळ आणि मासे मरून पडण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. मात्र, प्रशासन व लोकप्रतिनिधी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतात. जलप्रदूषण कमी करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी गणपतीच्या मूर्तीचे घरच्याघरी विसर्जन करण्याचे आवाहन महापौर गीता जैन, उपमहापौर प्रवीण पाटील व आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शुक्रवारी पालिकेच्यावतीने नागरिकांना केले. त्यासाठी ३१ आॅगस्टला मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात याची प्रात्यक्षिके तसेच बैठक झाली. महापौर, उपमहापौर, आयुक्तांसह स्थायी समिती सभापती हरिश्चंद्र आमगावकर, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे उपस्थित होते. पुणे महापालिकेत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने छोट्या आकाराच्या मूर्ती घरच्याघरी बादलीमध्ये विसर्जित करण्याचा उपक्रम राबवला जातो. याबाबत, पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या वैज्ञानिक डॉ. शुभांगी उंबरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. यात लहान आकाराच्या मूर्ती घरीच विसर्जित करण्यासाठी त्या आकाराच्या बादलीत पाणी घेऊन मूर्तीच्या वजनाचे अमोनियम बायकार्बोनेट (बेकरीत वापरला जाणारा सोडा) मिसळावे. मग, त्यात मूर्तीचे विसर्जन करायचे. दर दोनतीन तासांनी मिश्रण ढवळायचे. ४८ तासांत मूर्ती विरघळते. स्थिर झालेल्या पाण्यातून अमोनियम सल्फेट नावाचे उत्तम प्रतीचे खत मिळते. तर, विघटनातून उरलेल्या कॅल्शियम कार्बोनेटचे अनेक उपयोग आहेत, अशी माहिती उंबरकर यांनी दिली. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींसाठी वापरला जाणारा रंग घातक रसायनांपासून तयार होतो. शिवाय, प्लास्टर आॅफ पॅरिस विरघळत नाही. पण, घरच्याघरी विसर्जन केल्यास प्रदूषण टाळता येते, असे डॉ. उंबरकर म्हणाल्या. त्या अनुषंगाने पालिकेने भक्तांसाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात अमोनियम बायकार्बोनेट विनामूल्य उपलब्ध असल्याचे महापौर म्हणाल्या. (प्रतिनिधी) >अधिकाऱ्यांवर कारवाई करा; आयुक्तांकडे तक्रारपालिकेने याबाबतची कोणतीच कल्पना नगरसेवकांना दिली नसल्याबद्दल शिवसेना नगरसेवक जयंतीलाल पाटील यांनी संताप व्यक्त केला. आयुक्तांकडे लेखी तक्रारच केली असून बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.