शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 13:33 IST

माजी शहराध्यक्ष सचिन शेळके (वय ३८)यांच्यावर रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास खांडगे पेट्रोल पंपासमोर अज्ञात हल्लेखारांनी हल्ला करुन निघृण खून केला आहे

ऑनलान लोकमत तळेगाव दाभाडे, दि. १६ : नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सचिन शेळके (वय ३८)यांच्यावर रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास खांडगे पेट्रोल पंपासमोर अज्ञात हल्लेखारांनी हल्ला करुन निघृण खून केला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रकार घडल्यामुळे तळेगावमध्ये तणावाचे वातावरण आहे.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तळेगाव स्टेशन येथे सचिन शेळके वास्तव्यास असून आज सकाळी अकराच्या सुमारास विरोधी पक्षनेते सुनील शेळके यांची भेट घेतली. त्यानंतर ते कारने खांडगे पेट्रोल पंपाच्या दिशेने निघाले.

सव्वा अकराच्या सुमारास पेट्रोल पंपासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच सत्तूरीने वार केले आणि हल्लेखोर पळून गेले. दरम्यान ही घटना पाहणाऱ्या नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या शेळकेंना पवना हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तळेगाव बाजारपेठ बंदया घटनेनंतर तळेगाव दाभाडे परिसरात मोठ्याप्रमाणावर तणावाचे वातावरण असून तळेगाव दाभाडेची बाजारपेठ बंद केली आहे. पुण्यातील ससुन रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार बाळा भेगडे यांनी संपूर्ण मावळ बंदचे आवाहन केले आहे.

घटनास्थळी सापडली काडतुसेमोठ्याप्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. हल्लेखोरांनी प्रथम हवेत गोळीबार केला. त्यामुळे घटनास्थळी जीवंत चार काडतुसे सापडली आहेत. तळेगाव दाभाडे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शेळके यांची खून झाल्याने तनाव निर्माण झाला आहे.माजी नगराध्यक्ष सचिन शेळके कार्यकर्ता ते नगराध्यक्ष अशी सचिन शेळके यांची वाटचाल आहे. तळेगाव स्टेशन येथे शेळकेवस्ती येथे शेळके यांचे निवासस्थान असून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख असून प्रभाग एक मधून एकदा निवडूण आले आहेत. तसेच भारतीय जनता पक्षांचे शहराध्यक्षपद भूषविले आहे. तसेच नगरसेवक, उपनगराध्यक्ष, प्रक्षप्रतोद आणि २००९- २०१० मध्ये त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे. प्रभाग क्रमांक एक मधून शेळके निवडणूकीसाठी इच्छुक होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी, आई-वडील, तीन भाऊ, दोन मुली असा परिवार आहे.