शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांच्या दिशेने फेकली चप्पल

By admin | Updated: February 10, 2016 04:36 IST

चार वर्षांपासून दरोड्याच्या खटल्यामध्ये केवळ तारखाच पडत राहिल्याने वैतागलेल्या एका आरोपीने सुनावणीच्या वेळी चक्क न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकून शिवीगाळ करण्याची

मुंबई : चार वर्षांपासून दरोड्याच्या खटल्यामध्ये केवळ तारखाच पडत राहिल्याने वैतागलेल्या एका आरोपीने सुनावणीच्या वेळी चक्क न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकून शिवीगाळ करण्याची घटना मंगळवारी कुलाबा येथील जिल्हा सत्र न्यायालयात घडली. त्याच्या या आकस्मिक कृतीमुळे कोर्टातील सर्व जण भांबावून गेले. मदन चौहान (वय ३०) असे या आरोपीचे नाव असून त्याच्या या कृतीबद्दल कुलाबा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एका दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये चेंबूरमधील आरसीएफ पोलिसांनी २०१२ मध्ये चौहानला अटक केली होती. त्याच्या खटल्यासाठी त्याला सुनावणीसाठी पाचारण केले जात होते. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कुलाबा येथील सत्र न्यायालयाचे न्या. एस.व्ही पाटील यांच्यासमोर त्याला उभे करण्यात आले. कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख मिळाल्याने चौहानला संताप आला आणि त्याने आपली चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. चप्पल कोर्टाच्या डायसला लागून खाली पडल्याने न्यायाधीशांना दुखापत झाली नाही. त्यानंतर चौहानने न्यायाधीशांना शिवीगाळ केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौहानविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)