शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात प्रचार करा अन्यथा कारवाई!

By admin | Updated: January 14, 2017 05:09 IST

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी

मुंबई : महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्येक मंत्र्याला ग्रामीण सभा घ्यावीच लागतील. जे मंत्री गावागावात सभा घेणार नाहीत त्यांना कारवाईला सामारे जावे लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी आपल्या मंत्र्यांना दिल्याचे समजते. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सध्या उद्धव ठाकरे यांनी बैठकांचे सत्र चालविले. मातोश्री या निवासस्थानी गुरुवारी मुंबईतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतल्यानंतर उद्धव यांनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली. या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मंत्री आणि आमदारांवर जिल्हावर जबाबदारी सोपविण्यात आली. युती झाल्यास भाजपाला कोणत्या जागा सोडायच्या यावरही चर्चा झाली. नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेना मंत्र्यांनी दौरे न केल्याने शिवसेनेला फटका बसल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकात मंत्र्यांना ग्रामीण भागात फिरावेच लागेल, अशी ताकीद उद्धव यांनी आपल्या मंत्र्यांना दिली. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री दीपक सावंत, राज्यमंत्री दीपक केसरकर, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर यांच्यासह मुंबईतील आमदार सुनिल प्रभू, अनिल परब, अजय चौधरी उपस्थित होते. मातोश्री बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांची हजेरी घेतल्याच्या वृत्ताला रामदास कदम यांनी दुजोरा दिला. प्रचारासाठी सर्व मंत्र्यांना ग्रामीण भागात जावे लागेल, सभा घ्याव्याच लागतील, असे सक्त आदेश उद्धव यांनी दिले असून ते स्वत: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)