शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तरतुदींची पेरणी

By admin | Updated: July 11, 2014 02:30 IST

आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कृषी क्षेत्रसाठी ठोस दिशा न दाखविता तरतुदींची मात्र भरघोस पेरणी केली आहे.

आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कृषी क्षेत्रसाठी ठोस दिशा न दाखविता तरतुदींची मात्र भरघोस पेरणी केली आहे.
 
किसान विकासपत्र
शेतक:यांना आर्थिक बचतीसाठी किसान विकास पत्र योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शेतक:यांना किसान विकास पत्रमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत अल्पभूधारकांना मदत होईल.
 
किसान टीव्ही
शेतीविषयी येणारे 
नवे तंत्रज्ञान, संशोधन आणि विविध 
योजनांची माहिती देणारे तसेच शेतक:यांचे प्रबोधन करण्यासाठी खास किसान टीव्ही 
ही वाहिनी यावर्षीच सुरू करणार आहे. 
 
8 लाख कोटींचे लक्ष्य
शेतक:यांना विविध अवजारे, 
बी-बियाणो, शेतीच्या आधुनिकीकरणासाठी आणि शेतीचा कजर्पुरवठा यासाठी बँकांना 8 लाख कोटींचे लक्ष्य देण्यात आले आहे. यामुळे शेतीच्या विकासासह शेतक:याचे जीवनमानही उंचावेल, अशी अपेक्षा आहे. यात लघू पतपुरवठय़ाचा समावेश आहे.
 
नवी कृषी विद्यापीठे
देशात आणखी नवीन कृषी विद्यापीठे स्थापन करण्यात येणार आहेत. राजस्थान आणि आंध्र प्रदेशात कृषी विद्यापीठ, तर हरयाणा आणि तेलंगण राज्यात फलोत्पादनासाठी स्वतंत्र दोन विद्यापीठे स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. 
 
गंगा योजना
गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी नमामी गंगा योजना सुरू करणार असून, 2037 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय गंगाघाट दुरुस्तीसाठी 1क्क् कोटी विशेष प्राधिकरण स्थापन करण्यात येईल.
 
सिंचन योजना
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद निव्वळ सिंचन प्रकल्पासाठी आहे. या योजनेतून विविध राज्यांतील  प्रकल्पांना मदत.
 
शेतक:यांना सात टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. वेळेत कर्जाची फेड करणा:या शेतक:यांना तीन टक्के व्याजाची सूट देण्यात येणार आहे. 
 
धान्याच्या वैज्ञानिक सुविधांसाठी गोदामे बांधण्यात येणार आहेत. यासाठी पाच हजार कोटींची तरतूद केली आहे. ईशान्य भारतात सेंद्रिय शेतीसाठी एक हजार कोटींची (1क् अब्ज) तरतूद केली आहे.