शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बहुमत सिद्ध करा नंतरच सरकार चालवा

By admin | Updated: November 24, 2014 01:14 IST

राज्यातील भाजप सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

फडणवीस सरकारवर चव्हाण यांचे टीकास्त्र नागपूर : राज्यातील भाजप सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. फडणवीस सरकारने आधी बहुमत सिद्ध करावे, नंतरच सरकार चालवावे अशी मागणी करीत हिवाळी अधिवेशनात काँग्रेस राज्य सरकारला घाम फोडणार असल्याचे संकेत चव्हाण यांनी पत्रपरिषदेत दिले. केवळ आवाजी मतदानाने सत्तेत आलेले राज्यातील भाजपचे सरकार घटनाबाह्य असल्याचे मत सर्वोच्च माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांनी शनिवारी व्यक्त केले होते. याचा दाखला देत चव्हाण म्हणाले, विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपने सभागृहाची दिशाभूल केली. यावेळी विधानसभेतील कामकाजाचा क्रम अध्यक्षांनी सभागृहाला विश्वासात न घेता बदलला. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशीचे ‘ व्हिडिओ क्लिपिंग’ का उपलब्ध करून दिले जात नाही, असा सवाल चव्हाण यांनी यावेळी केला. राज्यपालांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना १५ दिवसांत बहमुत सिद्ध करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ, शिवसेना आणि काँग्रेस विरोधात असताना बहुमतासाठी लागणारा १४५ चा आकडा सरकारजवळ नव्हता, त्यामुळे गोंधळ निर्माण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन हेतूपुरस्सर करण्यात आल्याचे सांगत हिवाळी अधिवेशनात आणखी काही आमदार निलंबित करून कृत्रिम बहुमताचा आकडा गाठण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका चव्हाण यांनी यावेळी केली. विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासाठी भाजप सरकारने केलेल्या कृतीची माहिती राज्यपालांना देण्यात आली आहे. मात्र त्यावर काहीएक झाले नसल्याने या प्रश्नावर काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रपतींची वेळ मागितल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)विरोेधी पक्षात कोण ? विरोेधी पक्षात कोण आणि सरकारसोबत कोण हे राज्यातील जनतेला कळण्यासाठी आधी सरकारने मतदानाने बहुमत सिद्ध करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीने सरकारला टेकू दिला आहे तर शिवसेना सत्तेच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षाची सक्षम भूमिका वठवेल, असे चव्हाण यांनी एका प्रश्नांच्या उत्तरात स्पष्ट केले. फडणवीस-गडकरी यांच्यात विसंगती राज्यात महिनाभरात एलबीटी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. मात्र राज्य मंत्रिमंडळाने एलबीटी रद्द करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे एलबीटीसंदर्भात दोन्ही नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यात विसंगती असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. जवखेडे हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा पाथर्डी येथील जवखेडे हत्याकांडाचा तपास संथगतीने सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस आतापर्यंत जवखेडे येथे गेले नाहीत. तपासाला गती देण्यासाठी या प्रकरणाची चौैकशी सीबीआयकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी चव्हाण आणि ठाकरे यांनी यावेळी केली.