शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेला विरोध

By admin | Updated: July 31, 2016 01:46 IST

नगरसेवकांच्या शिस्तीचा लगाम आयुक्तांच्या हातात देण्यास सर्वपक्षीय गटनेत्यांनी आज विरोध दर्शविला.

मुंबई : नगरसेवकांच्या शिस्तीचा लगाम आयुक्तांच्या हातात देण्यास सर्वपक्षीय गटनेत्यांनी आज विरोध दर्शविला. बेशिस्त नगरसेवकांवर कारवाई करणारे हे महापौरांचे अधिकारी आहेत. समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार करेल, असा निर्णय गटनेत्यांनी आज घेतला. मात्र, सभागृहात मोबाइल जॅमर लावणे, नगरसेवकांची तपासणी आणि अन्य बैठकांना उपस्थित राहण्यास प्रतिबंध या आयुक्तांच्या शिफारशी फेटाळण्यात आल्या आहेत. देवनार डम्पिंग ग्राउंडवर लागणाऱ्या आगीच्या प्रश्नावर पालिकेच्या महासभेत चर्चा सुरू असताना विरोधी पक्षाच्या एका नगरसेवकाने महापौरांच्या दिशेने कचरा टाकला. कागदाचे बोळे फेकणे, शिट्या वाजवणे असे प्रकार वारंवार घडतात. याची दखल घेऊन आयुक्त अजय मेहता यांनीच नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार केली आहे. ही आचारसंहिता सर्व पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत आज चर्चेसाठी आली होती. मात्र, नगरसेवकांवर कारवाईचा अधिकार आयुक्तांना देण्यास सर्वच पक्षीय गटनेत्यांनी विरोध दर्शविला. ही लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा आहे. अशी नाराजी गटनेत्यांनी व्यक्त केली. महापौरांनी निलंबन केल्यानंतरही सभागृहाबाहेर जाण्यास नकार देणाऱ्या नगरसेवकांना बाहेर काढण्यासाठी मार्शल ठेवण्यास हरकत नाही. मात्र, नगरसेवकांची झडती घेऊन सभागृहात प्रवेश देणे हे अपमानास्पद आहे असे मत गटनेत्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)>महापौरांची समिती ठरवणार आचारसंहितामहापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार करेल. यावर सभागृहात चर्चा होईल. नगरसेवकांनी याविषयी अनुकूलता दर्शवल्यानंतर नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले. >मोबाइल जॅमर नकोचसभागृहात चर्चेदरम्यान खणखणणाऱ्या मोबाइलमुळे कामकाजात व्यत्यय येतो. वारंवार सूचना करूनही नगरसेवक ऐकत नाहीत. त्यामुळे मोबाइल जॅमर लावण्याची शिफारस आयुक्तांनी केली आहे. मात्र, नगरसेवकांना अनेक महत्त्वाचे फोन येत असतात. त्यांच्या विभागात इर्मजन्सी येऊ शकते, अशा वेळी त्यांचा मोबाइल बंद असेल तर त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचणार नाही. त्यामुळे जॅमर नकोच असा युक्तिवाद गटनेत्यांनी मांडला.