शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

फिर्यादी पोलीस निरीक्षकावरच केले गुन्हे दाखल

By admin | Updated: July 6, 2016 22:42 IST

सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला साडेतीन कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानंतर सदरची रक्कम देण्यास नकार देणाऱ्या लॉटरी संचालकासह सिक्कीम

ऑलाइन लोकमत

अकोला, दि. ६ : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला साडेतीन कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानंतर सदरची रक्कम देण्यास नकार देणाऱ्या लॉटरी संचालकासह सिक्कीम सरकारविरुद्ध न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचा मंगळवारी आदेश दिला. या आदेशामध्ये कोतवालीच्या तत्कालीन ठाणेदारांनी सरकारपक्षातर्फे फिर्याद दाखल करण्याचे नमूद असताना, सिटी कोतवाली पोलिसांनी आदेशाचे योग्य अवलोकन न करता फिर्यादी असलेल्या तत्कालीन ठाणेदारांवरच गुन्हे दाखल केल्याचा अजब-गजब प्रकार बुधवारी समोर आला.

सिटी कोतवाली पोलिसांच्या ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर प्रकरण नजरचुकीने झाल्याची सारवासारव करीत एक पत्र तयार करून ते न्यायालयामध्ये सादर केले आहे. पोलीस कर्मचारी संजय व्यंकटराव चक्रनारायण यांनी आॅगस्ट २०१५ रोजी गांधी रोड येथील नितीन मुरलीधर गोयनका याच्या लॉटरी दुकानातून सिक्कीम सरकारच्या लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. ४ आॅगस्ट २०१५ रोजी सोडत निघाल्यानंतर चक्रनारायण यांना ३ कोटी ४७ लाख रुपयांची लॉटरी लागली. त्यांनी लॉटरी संचालक नितीन गोयनका याला लॉटरी लागल्याचे सांगितले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन रक्कम देण्यास नकार दिला.

त्यानंतर चक्रनारायण यांनी सिक्कीम सरकारच्या मुंबई येथील लॉटरीच्या मोठ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, त्यांनी थेट राष्ट्रीय ग्राहक न्यायालय, दिल्ली आणि अकोला न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने फसवणुकीनुसार गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. न्यायालयाच्या आदेशाचे व्यवस्थित अवलोकन न करता ठाणा हजेरीवरील कर्मचाऱ्याने सरकारतर्फे तत्कालीन कोतवाली ठाणेदार फिर्यादी असतानादेखील तत्कालीन पोलीस निरीक्षकांना प्रथम क्रमांकाचे आरोपी बनविले. त्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या सिक्कीम सरकार, नितीन गोयनका व आणखी दोघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.

ही चूक दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी पोलिसांच्या लक्षात येताच पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. पोलिसांनी चुकीची दुरुस्ती करण्यासाठी गोपनीय पद्धतीने न्यायालयात पत्र देऊन या प्रकरणाचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रकरणामुळे कोतवाली पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.