शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याचा प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: June 10, 2016 05:22 IST

देशात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होत असून ४२ टक्के अपघात हे व्यावसायिक (कमर्शियल) वाहनांमुळे होत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : देशात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होत असून ४२ टक्के अपघात हे व्यावसायिक (कमर्शियल) वाहनांमुळे होत असल्याचे समोर आले आहे. अपघात रोखण्यासाठी वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवण्याची सक्ती सर्व राज्यांना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र राज्यातील सर्व कमर्शियल वाहनांना स्पीड गर्व्हनर बसविण्याचा प्रस्ताव धूळ खात पडून असल्याची माहिती रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या नॅशनल रोड सेफ्टी काउन्सिलचे सदस्य डॉ. कमलजित सोय यांनी दिली. देशभरात दोन कोटी कमर्शियल वाहने असून महाराष्ट्रात त्यांची संख्या जवळपास २० लाख आहे. वाहन चालक किमान दहावी उत्तीर्ण असणे आणि त्याला वाहतुकीच्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. मात्र कमर्शियल वाहनांवर असलेले चालक हे दहावी पासही नसतात आणि त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे पालनही काटेकोरपणे केले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्यानेच स्पीड गर्व्हनर बसविणे आवश्यक आहे, असे मत सोय यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना स्पीड गर्व्हनर बसविणे बंधनकारक केले असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. काही ठराविक राज्ये सोडल्यास इतर राज्यांनी वेग नियंत्रक बसविणे बंधनकारकही केले नसल्याचे सोय यांनी सांगितले. (प्रतिनिधी) >देशभरात रोज होतात २० हजार अपघात देशात दरवर्षीय पाच लाख तर रोज २0 हजार अपघात होतात. दहशतवादी हल्ल्यांत १५ वर्षांत ३५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र १५ वर्षांत रस्ते अपघातांत १ लाख ५0 हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात १८ कोटी वाहने असून २८ कोटी लायसन्स आहेत.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २0१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून महाराष्ट्रात ४४ हजार ३८२ रस्ते अपघात झाल्याचे समोर आले आहे. १३ हजार ५२९ जणांनी आपले प्राण गमावले, तर ४३ हजार ६६८ जण जखमी झाले. त्यामुळे वेग नियंत्रकांची गरज आहे.