शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जलपरीच्या मुदतवाढीसाठी पुन्हा प्रस्ताव

By admin | Updated: July 27, 2016 20:07 IST

लातूर शहराला मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. मात्र लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अद्याप पाणीसाठा झाला नाही.

रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे मागणी : आॅगस्ट अखेरपर्यंत सेवा द्या लातूर : लातूर शहराला मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. मात्र लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अद्याप पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे आॅगस्ट अखेरपर्यंत जलपरीची सेवा कायम ठेवावी, असा प्रस्ताव महानगर पालिकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आला आहे.

लातूर शहरात अभुतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने १२ एप्रिलपासून लातूर शहराला रेल्वेव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या अर्धा पावसाळा संपला तरी मांजरा प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. शिवाय, जिल्ह्यातील प्रकल्पही कोरडेठाक आहेत. सध्याही पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची सेवा बंद करण्यात येऊ नये. जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही आणि प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत जलपरीची सेवा सुरू ठेवावी, असे लातूर महानगर पालिकेने सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. परंतू या पावसाचे पाणी जमिनीच्या बाहेर अद्याप आले नाही. त्यामुळे प्रकल्पात पाण्याचा साठा झालेला नाही. मांजरा प्रकल्प क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी आहे. परिणामी, मांजरा प्रकल्प कोरडा आहे. या प्रकल्पात पाणीसाठा झाल्याशिवाय, लातूरकरांना नळाव्दारे पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे जलपरीची सेवा आवश्यक असल्याचे पत्र रेल्वे पशासनाला पाठविण्यात आले आहे.

मुदतवाढ मिळणार ; रेल्वे प्रशासन सकारात्मक...रेल्वेकडे मुदत वाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला मुदतवाढ मिळेल. जोपर्यंत पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत रेल्वेची सेवा राहणार आहे. तसे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे बोलणे झाले असून, प्रस्तावाला मुदवाढ देण्यासाठी रेल्वे प्रशासन सकारत्मक असल्याचे लातूर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कावळे यांनी सांगितले.