शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

दूध उत्पादकांची १७ रुपयांवरच बोळवण

By admin | Updated: May 22, 2015 23:45 IST

साखरेच्या कमी दरामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाने देखील धोका दिला आहे.

सोमेश्वरनगर : साखरेच्या कमी दरामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाने देखील धोका दिला आहे. काही मोजक्या दूध संस्था वगळता बहुतांश संस्थांनी १७ रुपये प्रतिलिटर दराची बोळवण केली आहे. त्यामुळे दुग्ध विकासमंत्री एकनाथ खडसे यांनी दुधाचा किमान खरेदी दर न दिल्यास फौजदारी करू, असा सज्जड दम दिला आहे. त्याची अंमलबजावणी होणार का, असा प्रश्न दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. दुग्धमंत्री एकनाथ खडसे यांनी नुकताच राज्यातील दूध संस्थांनी दूध उत्पादकांना ३.५ फ ॅट व ८.५ स्निग्धांशाला २० रुपये प्रतिलिटर किमान दर द्यावा अन्यथा फौजदारी करू, असे आदेश दले आहेत. मात्र, दुग्धमंत्र्यांच्या या दमाला घाबरणारे ते दूध संस्थाचालक ते कसले? दूध पावडरचे दर घसरल्याने अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्याने दुधाचे दर घसरले. दूध उत्पादकांना १६ ते १८ रुपये दुधाला दर मिळत आहे. त्यामुळे आता साखर धंद्यापाठोपाठ दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचेही कंबरडे मोडले आहे. सध्या मिळणारा दर पाहता दूध उत्पादकांच्या हातात काहीच उरत नाही. पिढ्यानपिढ्या दूध धंद्यात कष्ट करणारा शेतकरी अजून सायकलवरच जाऊन डेअरीला दूध घालत आहे. मात्र, दूध संकलन करणाऱ्या दूध संस्थांनी अल्पावधीतच करोडो रुपयांची माया जमवत ‘मजल्यावर मजले’ बांधले आहेत. त्यांच्या मुसक्या कोण आवळणार, असाही प्रश्न दूध उत्पादक विचारत आहेत. (वार्ताहर)संस्थांनी करोडो रुपये कमविले मागील दिवाळीपासून दुधाचे दर टप्प्याटप्प्याने कमी होत गेले. ज्या वेळी दुधाला २४ ते २५ रुपये दर होता, त्या वेळी ३८ ते ३९ रुपये प्रतिलिटर पिशवीबंद दुधाला दर मिळत होता. मात्र, आता दूध १६ ते १८ रुपये प्रतिलिटर एवढ्या नीचांकी पातळीवर आले आहे. तरीही पिशवीबंद दूध विकणाऱ्या संस्थांनी अजून ३८ ते ३९ रुपये जुनाच दर ठेवला आहे. एका लिटरमागे २२ ते २३ रुपयांचा मलिदा ते चाखत आहेत. त्यामुळे दूध उत्पादक व पिशवीबंद दूध घेणारे ग्राहक यांच्यामध्ये असणाऱ्या दूध संस्थांनी करोडो रुपये कमविले आहेत. ४राज्य शासनाने काढलेल्या या कायद्यात अजून फौजदारी कारवाईची तरतूद नाही. शासनाला यासाठी अध्यादेश काढावा लागणार आहे. मात्र, खासगी दूध संस्थाचालक या अध्यादेशाविरोधात एकत्र येऊ लागले आहेत. दूध संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई सुरू केल्यास दूध उत्पादकांचे दूधच स्वीकारायचे नाही, हा मार्ग त्यांच्यापुढे उपलब्ध आहे. यामुळे शेवटी दूध उत्पादकांचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनालाही विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. शासनाने सर्व खासगी व सहकारी दूध संस्थाचालकांना एकत्र घेऊन ‘मिल्क पॉलिसी’ ठरविण्याची गरज आहे. कोणतीही दूधसंस्था १०० टक्के पिशवीबंद दूध करत नाहीत. उर्वरित ७० ते ७५ टक्के लूज दूध हे १६ ते १७ रुपयांनी विकावे लागते. जर शासनाने दुधाला हमीदर दिला तर दूध उत्पादकांना प्रतिलिटर २० रुपये देणे सहज शक्य आहे.- शिवाजी पाटील , व्यवस्थापक, शिवामृत दूध, अकलूजसध्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न भेडसावत आहे. हे अतिरिक्त दूध हमीदर देऊन शासनाने खरेदी करावे. तसे झाल्यास दूध उत्पादकांना २० रुपये दर देण्यात कोणतीच अडचण नाही.- नितीन थोपटे ,कार्यकारी संचालक, अनंत दूध, भोरखरेदीदर वाढवावा आणि विक्रीदर कमी करावा हे शासनाचे धोरण अयोग्य आहे. दूध उत्पादकांना दर वाढवून मिळालाच पाहिजे. याच्याशी आम्ही सहमत आहोत. मात्र, खरेदीदर २० आणि पॅकिंग दर ४० रुपये ही होत असलेली ओरड अत्यंत चुकीची आहे. दूध पॅकिंगसाठी संस्थांना विविध खर्च येत असतो. - एस. पी. राणे , दूध संकलन अधिकारी, गोविंद दूध, फलटण