शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे व्यवसायवृद्धीस प्रोत्साहन

By admin | Updated: September 30, 2016 02:54 IST

राज्यातील प्रामाणिक करदात्यांना त्यांच्या व्यवसायवृद्धीस प्रोत्साहन मिळेल असा राज्य वस्तू आणि सेवा कर कायदा तयार केला जाईल, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुंबई : राज्यातील प्रामाणिक करदात्यांना त्यांच्या व्यवसायवृद्धीस प्रोत्साहन मिळेल असा राज्य वस्तू आणि सेवा कर कायदा तयार केला जाईल, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राज पुरोहित, योगेश सागर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, विक्रीकर आयुक्त राजीव जलोटा, फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष विनिश मेहता यांच्यासह फामचे राज्यभरातील पदाधिकारी-व्यापारी-उद्योजक उपस्थित होते.राज्यात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करताना पारदर्शक, सुटसुटीत कर प्रणाली व तसे पोषक वातावरण उपलब्ध करून देऊ, असे सांगून वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले, वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे राज्यांतर्गत कर स्पर्धा नाहीशी होऊन करचोरीला आळा बसेल. वस्तू आणि सेवा कर प्रणाली देशातील सर्व राज्यांना कररचनेमध्ये एकसमान पातळीवर आणणार असून ती सर्वत्र एकाच पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यामुळे एकसंध कररचना आणि सुरक्षित बाजारपेठेचे फायदे राज्यालाही मिळतील.वस्तू आणि सेवा कर परिषदेची एक बैठक यापूर्वी झाली आहे. त्यामध्ये वार्षिक २० लाख रुपयांपर्यंतची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांना वस्तू आणि सेवा करातून सूट देण्याची महाराष्ट्र राज्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. परिषदेच्या यापुढील बैठकांमध्ये कोणत्या वस्तू करमुक्त ठेवायच्या, कराचे दर किती असावेत यावर निर्णय होतील, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)अभय योजनेला मुदतवाढविक्रीकराबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी अभय योजनेची मुदत ४५ दिवसांनी वाढवली असल्याचेही वित्तमंत्र्यांनी या वेळी सांगितले. जीएसटीमध्ये राज्य आणि केंद्र शासनाचे १७ कर विलीन होणार असल्याने कराचा बोजा कमी राहील, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, आॅक्ट्रॉय, एलबीटीसारखे कर जीएसटी आल्यानंतर अस्तित्वात राहणार नाहीत. त्यामुळे व्यापारी-उद्योजकांनी कुठल्याही शंका मनात घेऊन जाऊ नये.