शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

विवेक मूर्तींचे नामांकन रोखण्याच्या कृतीचा निषेध

By admin | Updated: May 9, 2014 23:34 IST

अमेरिकी सर्जन जनरल अर्थात महाशल्यचिकित्सक या महत्त्वाच्या पदावर अनिवासी भारतीय डॉक्टर विवेक मूर्ती यांचे नामांकन रोखण्यासाठी अमेरिकी संसद सदस्यांचा एक गट प्रयत्नशील आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकी सर्जन जनरल अर्थात महाशल्यचिकित्सक या महत्त्वाच्या पदावर अनिवासी भारतीय डॉक्टर विवेक मूर्ती यांचे नामांकन रोखण्यासाठी अमेरिकी संसद सदस्यांचा एक गट प्रयत्नशील आहे. संसद सदस्यांवर दबाव आणण्याच्या बंदूक लॉबीच्या प्रयत्नांचा वैद्यक क्षेत्रातील एका ख्यातनाम नियतकालिकाने निषेध केला आहे. या कृतीवर ‘राजकीय ब्लॅकमेलिंग’ची नवी पद्धत अशा शब्दांत टीका केली. ‘न्यू इंग्लंड मेडिकल जर्नल’ने आपल्या ताज्या अंकात मूर्ती यांचे नामांकन रोखण्याच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यात म्हटले की, महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय रायफल असोसिएशन यासारख्या विशेष हितासाठी काम करणार्‍या संघटनांना देशाच्या सर्वोच्च डॉक्टरच्या नियुक्तीसाठी नकाराधिकार असला पाहिजे का? हा विचारच अस्वीकारार्ह आहे. अमेरिकी सिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर बोस्टनमध्ये राहणारे ३६ वर्षीय मूर्ती हे पहिले भारतीय- अमेरिकी आणि उच्च पदावर जाणारे सर्वांत तरुण अधिकारी ठरतील. सिनेटमध्ये १० डेमॉक्रॅटिक सदस्यांनी बंदुकीवरील नियंत्रणाशी संबंधित आपल्या खासगी विचारांच्या मुद्यावरून अक्षरश: मूर्ती यांच्या नामांकनाविरोधात मत देण्याची तयारी चालवली होती, असा आरोप या संपादकीयात केला आहे. (वृत्तसंस्था)

रायफल संघटनेच्या नेतृत्वाखाली बंदूक लॉबी मूर्ती यांच्या नामांकनास विरोध चालविला आहे. कारण भारतीय वंशाच्या डॉक्टरने अमेरिकेतील बंदूक संस्कृतीविरोधात ओबामांच्या सुरात सूर मिसळला आहे. रायफल संघटनेच्या लॉबींवरून आमच्या लोकप्रतिनिधींनी आपली किती ताकद अशा संघटनांना सोपविली आहे, हे दिसून येते. अमेरिकेत दरवर्षी बंदुकीने ३०,००० जणांचा बळी जातो. हा आकडा पाहता मूर्ती यांनी बंदूक संस्कृतीस केलेला विरोध अतार्किक असल्याचे दिसत नाही, अशा शब्दांत मूर्ती यांचे समर्थन या संपादकीयात करण्यात आले आहे.