शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली स्फोटाचा फलकांद्वारे निषेध

By admin | Updated: June 27, 2016 02:31 IST

मिलापनगर रहिवासी वेल्फेअर असोसिएशनने मृतांच्या नातलगांना केवळ दोन लाखांची मदत देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करणारे फलक लावले.

डोंबिवली : प्रोबेस कंपनीतील स्फोटाला रविवारी एक महिना पूर्ण झाला. यानिमित्ताने मिलापनगर रहिवासी वेल्फेअर असोसिएशनने मृतांच्या नातलगांना केवळ दोन लाखांची मदत देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करणारे फलक लावले. मे महिन्याच्या २६ तारखेला प्रोबेस कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात १२ जणांना आपले जीव गमवावे लागले. या घटनेला महिना उलटायला आला तरी मृतांच्या नातेवाइकांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत सरकारने जाहीर केलेली नव्हती. ‘लोकमत’ने याला वाचा फोडताच शुक्रवारी डोंबिवलीत झालेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमादरम्यान मृतांच्या नातेवाइकांना २ लाखांची मदत सरकारच्या वतीने जाहीर केली. मात्र, मिलापनगर रहिवासी वेल्फेअर असोसिएशन या संघटनेने रविवारी सर्वत्र फलक लावून या तुटपुंज्या भरपाईबद्दल सरकारचा निषेध केला. १२ जण मृत्युमुखी पडले. त्यांना फक्त २ लाखांची मदत, मालमत्तेचे नुकसान झालेल्या रहिवाशांना भरपाई मिळणार का? स्फोटाला जबाबदार सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? चौकशी अहवाल कधी मिळणार? डोंबिवलीत आणखी स्फोट होण्याची आपण वाट बघताय का? असे सवाल त्यांनी सरकारला केले आहेत.कारखानदारांनी घेतली सुरक्षेची प्रतिज्ञाउत्पादकांची संघटना म्हणून कारखान्यांतील तसेच आजूबाजूच्या परिसरातील माणसांच्या सुरक्षेसाठी पुन्हा समर्पित आहोत. सुरक्षेबाबत प्रसार करण्यासाठी आणि असे अपघात पुन्हा होणार नाहीत, यासाठी मालक, अधिकारी आणि कामगार यांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. भविष्यात असे अपघात होऊ नयेत, म्हणून आम्ही अतीव काळजी घेऊ.