शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

साफसफाई करणारा ‘मामा’ होणार प्राध्यापक

By admin | Updated: September 10, 2016 01:16 IST

साफसफाई करणारा मामा एका हातात झाडू, तर दुसऱ्या हातात पुस्तक घेतो आणि अहोरात्र अभ्यास करून सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन प्राध्यापक झाला

सोमेश्वरनगर : महाविद्यालयातील बाक उचलणारा, साफसफाई करणारा मामा एका हातात झाडू, तर दुसऱ्या हातात पुस्तक घेतो आणि अहोरात्र अभ्यास करून सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन प्राध्यापक झाला असून, विद्यार्थांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील शिपाई या पदावर काम करणाऱ्या अमोल संपतराव लकडे याची ही कहाणी. अमोल हा मूळचा निंबूत लकडेवस्ती येथील रहिवासी. घरी थोडीफार जमीन असून वडील संपतराव व आई रंजना हे शेती करतात. अमोल दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर २००८मध्ये सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयामध्ये शिपायाची नोकरी करू लागला. मात्र, घरची हलाखीची परिस्थिती अमोलला काही शांत बसू देत नव्हती. २०१०मध्ये अमोलने १७ नंबरचा फॉर्म भरून बारावीला प्रवेश घेतला. बारावी परीक्षा उतीर्ण झाल्यावर काकडे महाविद्यालयांतर्गतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहि:स्थ प्रवेश घेतला. बीएपर्यंतचा अभ्यास शिपायाची नोकरी संभाळत रात्रीचा केला. संरक्षणशास्त्र विषय घेऊन कला शाखेची पदवी संपादन केली. मात्र, त्याची शिक्षणाची जिद्द त्याला गप्प बसू देत नव्हती. एका हातात साफसफाईचा झाडू, तर दुसऱ्या हातात सेटचे पुस्तक घेतले. त्याच्या या यशाने नवीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. याबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे, प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, सचिव जयवंतराव घोरपडे, सतीश लकडे, शिवाजी नेवशे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. (वार्ताहर)>दिवसा महाविद्यालयात काम, तर रात्रीच्या वेळी अभ्यास, असा दिनक्रम. आणि नुकत्याच २९ मे २०१६ रोजी पुणे येथे झालेल्या सेट परीक्षेत अमोलने ३५० पैकी १७८ गुण मिळवून सेट परीक्षेत यश संपादन केले.मी ही परीक्षा पास होण्यामध्ये आई, वडील, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अमोलला काकडे महाविद्यालयातच प्राध्यापकाची नोकरी मिळणार आहे.-अमोल लकडे