शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात सेंद्रिय केळीचे उत्पादन!

By admin | Updated: December 15, 2014 23:35 IST

राज्यातील केळी उत्पादकांना ठरणार प्रेरणादायक.

राजरत्न सिरसाट/अकोला : फळ विकत घेणे ऐकेकाळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे..घरात कोणी आजारी पडले तर फळ दिसायचे. आता सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढल्यामुळे घरोघरी फळांचा वापर वाढला आहे; पण या फळात रसायन, विषारी कीटकनाशकांचे प्रमाणही वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचे दुरगामी परिणाम होत आहेत. यावर मात करण्यासाठी अकोला जिल्हय़ात सेंद्रिय (बायोडायनॅमिक)केळी उत्पादनावर भर दिला जात असून, राज्यातील केळी उत्पादकांना प्रेरणादायी ठरणारे आहे. जिल्हय़ातील बाश्रीटाकळी येथील शेतकरी राजू इनामदार व विलास महल्ले यांनी प्रत्येकी दोन एकरावर (बायोडायनॅमिक) सेंद्रिय पद्धतीने केळी उत्पादनाला सुरुवात केली आहे. या केळीची नैसर्गिक चकाकी आणि गोडवा बघता,या केळीला प्रचंड मागणी वाढल्याने त्यांना या दोन एकरात जवळपास पाच लाख पन्नास हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.यावर्षी या शेतकर्‍यांनी पंचाग तिथीनुसार दोन एकरात ग्रँड-९ या जातीच्या केळीची बायोडायनॅमिक पद्धतीने लागवड केली आहे.यासाठी त्यांनी जीवामृत आणि तरळ खाद्य वापरू न शेतावरच बायोडायनॅमिक कंपोस्ट खत तयार केले आहे. या खताचा १0 ते १२ दिवसानंतर ठिबक पद्धतीने ( ड्रेचिंग)हे खत दिले जाते. रोग, किडीचे नियंत्रण करण्यासाठी याच किडीचा वापर केला जात आहे. सेंद्रिय पद्धतीने फळ उत्पादन केल्याने नागरिकांना विषमुक्त केळी तर उपलब्ध झालीच शिवाय उत्पन्नही भरघोस मिळाल्याने जिल्हय़ातील नव्हे तर विदर्भातील शेतकरी त्यांच्या शेतीला भेटी देत आहेत. *केळी घडाचे वजन ३८ किलोसेंद्रिय पद्धतीने केळी उत्पादन घेतल्याने केळीच्या घडाचे वजन ३८ किलो वाढले आहे. केळी लागवडीसाठी इनामदार व महल्ले यांनी दोन एकरात ३५00 टिश्यू कल्चर केळी लागवड केली.यासाठी त्यांना प्रतिनग १३ रुपये द्यावे लागले.इतर मशागत कपोस्ट कल्चर, दिव्यशक्ती ऊर्जा, इत्यादी मिळून प्रतिझाड केवळ ३९ रुपये मिळून दोन एकरला १,३६000 हजार रुपये खर्च झाला.*दोन एकरात सहा लाख ६५ हजारांचे उत्पन्न या दोन या शेतकर्‍यांनी प्रती झाड १९0 रुपये या प्रमाणे त्यांना ६ लाख ६५ हजार रुपये उत्पन्न मिळाले.म्हणजेच २ लाख २४ हजार रुपये निव्वळ नफा मिळाला.या सेंद्रिय केळीची माहिती घेण्यासाठी बाश्रीटाकळी येथे खान्देशसह राज्यातील शेतकरी भेटी देत आहेत.