शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातील निर्माल्यापासून होतेय खत निर्मिती

By admin | Updated: September 21, 2016 04:05 IST

निर्माल्यापासून खत निर्मितीचे काम रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थाने हाती घेतले आहे.

जान्हवी मोर्ये,

डोंबिवली- गणेशोत्सवात तयार झालेल्या निर्माल्यापासून खत निर्मितीचे काम रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थाने हाती घेतले आहे. त्यासाठी प्रतिष्ठानने १० दिवसांत कल्याणमधून १० टन निर्माल्य तर गणेश मंदिराने १० टेम्पो जैव कचरा गोळा केला. भक्ती मार्गाने पर्यावरण संरक्षण करता येते, असा संदेश या संस्थांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांनी त्याचे अनुकरण केल्यास कल्याण-डोंंबिवलीतील कचऱ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल, अशा आशावाद त्यांनी यानिमित्त व्यक्त केला आहे.प्रतिष्ठानचे कल्याण सदस्य अध्यक्ष अशोक शिंदे यांनी सांगितले की, कल्याणमधील गणेशघाट येथे दीड दिवसाच्या विसर्जनापासून निर्माल्य गोळा करण्यासाठी २०० सेवेकरी नेमले होते. त्यांनी जवळपास १० टन निर्माल्य गोळा केले. त्यातून केवळ जैव कचरा घेतला. त्यातील प्लॅस्टिकच्या पिशव्या वेगळ््या केल्या. लाल चौकी स्मशानभूमीजवळ १५ फूट रुंद, ३० फूट लांब आणि पाच फूट खोल, असा खड्डा खणला. त्यात दररोज जमा झालेले निर्माल्य टाकले. दर दिवशी त्यावर शेणाचा थर व पाणी टाकले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी चांगले ढवळून घेतले. त्यातून खत निर्माण होईल. प्रतिष्ठाने स्वखर्चाने हा उपक्रम राबवला आहे. त्याची प्रेरणा व संकल्पना प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांची होती. या उपक्रमातून कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी जागृती करण्यात आली.’ >गणेश मंदिर संस्थानने केली जागृतीडोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानातर्फे निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाते. मात्र यंदा प्रथमच गणेशोत्सवात संस्थाने त्याची जागृती केली. नेहरू मैदान, पंचायत बावडी, नांदिवली रोड, प्रगती कॉलेज, एमआयडीसी आणि गणेश मंदिर संस्थान या विसर्ज स्थळांहून निर्माल्य गोळा केले. १० दिवसांत १० टेम्पो भरले इतके निर्माल्य गोळा झाले. त्यातून प्लॅस्टिक वेगळे केले. जैव कचऱ्यापैकी सुका जैव कचरा बारीक करण्यासाठी मंदिराकडे क्रश मशीन आहे. एमआयडीसीतील जागेत या कचऱ्यापासून खत तयार केले जाते.खत तयार होण्यासाठी साधारणात: तीन आठवडे लागतात. शेण व पाणी टाकून थर लावला जातो. ते दोन तीन दिवसांनी ढवळून घेतले जाते. तयार झालेले खत मंदिर प्रति किलो १० रुपयाने विकते. देवाला वाहिलेले फूल पुन्हा देवाच्या चरणी वाहण्यासाठी हा उपक्रम आहे. >खताचा वापर झाडांसाठीकल्याण-डोंबिवलीत घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. महापालिकेने उपक्रमास सहकार्य केल्यास हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू करता येऊ शकतो, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. या उपक्रमात तयार होणाऱ्या खताचा वापर प्रतिष्ठानने नेवाळी, टिटवाळा, पडघा, मलंग रोड, फडके रोड, गणेश घाट येथे लावलेल्या झाडांसाठी केला जाणार आहे. >पर्यारण संरक्षणासाठी हा उपक्रम राबविल्याचे मंदिराचे पदाधिकारी प्रवीण दुधे यांनी सांगितले. गणेश मंदिर संस्थानचा आदर्श केडीएमसीने घेतल्यास स्वच्छ व सुंदर डोंबिवली लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते, असा विश्वास मंदिर संस्थानला आहे. त्यात संस्थानचा सक्रिया सहभाग असेल, अशी हमीही दुधे यांनी दिली.