शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

‘डेक्कन कलर’वर उत्पादन बंदी

By admin | Updated: September 22, 2014 02:32 IST

येथील एमआयडीसी फेज-२ मधील ‘डेक्कन कलर अ‍ॅण्ड केमिकल कंपनी’वर निष्काळजीपणासह नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे.

डोंबिवली : येथील एमआयडीसी फेज-२ मधील ‘डेक्कन कलर अ‍ॅण्ड केमिकल कंपनी’वर निष्काळजीपणासह नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. प्रदूषण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी उत्पादन बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळे या परिसरात प्रदूषण करणाऱ्या अन्य कंपनीचालकांमध्ये धास्ती पसरली आहे.गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एमआयडीसी परिसरातील रस्त्यावर विशिष्ट पावडर पडली असून ती पावसाच्या पाण्याच्या संपर्कात आल्याने ते पाणी निळे-हिरवे झाल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली. त्यानुसार, मंडळासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणाला भेट दिली. तेव्हा ‘डेक्कन कलर अ‍ॅण्ड केमिकल’ या खाद्यपदार्थांचे रंग बनवणाऱ्या कंपनीचा माल नेण्यात येत असताना गळती झाल्याने काही माल रस्त्यावर पडला. पावसाच्या पाण्याच्या संपर्कात येऊन तसा रंग झाला आणि शहरात पुन्हा एकदा प्रदूषणयुक्त पावसाची चर्चा वाऱ्यासारखी पसरल्याचे निदर्शनास आले, मात्र ही घटना त्या हिरव्या पावसाच्या घटनेसारखी नसल्याचा निर्वाळा उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी तत्काळ दिला होता. कंपनीच्या निष्काळजीपणाबाबत आणि मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कंपनीला उत्पादन करण्यास बंदी घातल्याचेही त्यांनी सांगितले.यासंदर्भात मंडळाने कंपनीला नोटीस बजावली असून तिची प्रत मनसेच्या राजेश कदम यांनाही दिली आहे. तसेच आगामी काळात अन्य नागरिकांनीही सतर्क राहून मंडळाच्या निदर्शनास काही बाबी आणून दिल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही. त्यासाठी मंडळही सतर्क असून नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे आवाहन त्यांनी केले.