शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ची पिकपाण्याच्या नियोजनासाठी निर्मिती

By admin | Updated: May 28, 2017 01:16 IST

शिवाजी विद्यापीठातील ‘बी.टेक’च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ विकसीत केले आहे. याद्वारे हवामान, पाणी, माती आणि पावसाचे प्रमाण याचा विचार करून पुढील सहा महिन्यांत

- तानाजी पोवार। लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील ‘बी.टेक’च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ विकसीत केले आहे. याद्वारे हवामान, पाणी, माती आणि पावसाचे प्रमाण याचा विचार करून पुढील सहा महिन्यांत कोणते पीक घेता येईल, हे शेतकऱ्यांना ठरविणे सोपे जाणार आहे. या अ‍ॅपमुळे शेतकऱ्याला आपल्या परिसरातील लागवड केलेल्या विविध पिकांची माहिती मिळेल. याशिवाय मातीची गरज, लागवडीची प्रक्रिया, रोग व कीड, खते आणि कीटकनाशके याविषयीची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे पिकांचे नियोजन करणे सोपे होणार आहे. शेतमाल विक्रीसाठी कोणत्या बाजारपेठेत नेला म्हणजे त्याला चांगला दर मिळेल, याची माहितीही अ‍ॅपवरील नकाशाच्या मदतीने मिळणार आहे. सरकारी योजनांचीही अद्ययावत माहितीही मिळेल. ‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’साठी या विद्यार्थ्यांचे योगदान 

शिवाजी विद्यापीठातील ‘बी.टेक’च्या अंतिम वर्षातील विवेक कुरूवडे (रा. खांबित, ता. आस्ती, जि. वर्धा), कोमल हाबीवंत (रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली), श्रद्धा निंबाळकर (सातारा), शीतल कुलकर्णी (रा. हिंगणगड, ता. खानापूर, जि. सांगली), शहदमनी मोमीन (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी विशेष परिश्रम घेतले.शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्याशी चर्चा करुन हे ‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ विकसीत केले आहे. येत्या पंधरा दिवसांत ‘गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. - प्रसन्न करमरकर, सहायक प्राध्यापक, संगणक शास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर