शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

‘कौन्सिलिंग’ची प्रक्रिया १७ जूनपासून

By admin | Updated: June 17, 2014 00:50 IST

‘डीएमईआर’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ मेडिकल एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च) संचालित करण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रम : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राहणार विभागीय केंद्रनागपूर : ‘डीएमईआर’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ मेडिकल एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च) संचालित करण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार १७ जूनपासून विभागीय केंद्रांवर ‘कौन्सिलिंग’ करण्यात येणार आहे. संपूर्ण विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे विभागीय केंद्र राहणार असल्याी माहिती देण्यात आली आहे.८ मे रोजी ‘एमएच-सीईटी’ परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच घोषित झाला. त्यानुसार यातील गुणांनुसार आता प्रवेशप्रक्रियेला प्रत्यक्षपणे सुरुवात होणार आहे. विद्यार्थी १६ जून म्हणजेच सोमवारपासून ‘डीएमईआर’च्या संकेतस्थळाहून माहिती पुस्तिका ‘डाऊनलोड’ करू शकतात. विद्यार्थ्यांच्या राज्यनिहाय गुणवत्ता क्रमानुसार प्रत्यक्षपणे विभागीय केंद्रांवर ‘कौन्सिलिंग’साठी उपस्थित राहणे आवश्यक राहणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना अर्जात पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात येईल. १७ ते २१ तारखेपर्यंत ८०९६ विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येतील. २० व २१ जून या तारखांना केवळ आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांनीच उपस्थित रहावे, अशी सूचना देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गात राज्य गुणवत्ता यादीत ४११० क्रमांकापर्यंतच्या उमेदवारांनाच बोलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)पसंतीक्रम अर्ज भरण्याचे वेळापत्रक(सर्व वर्ग-प्रवर्गांसाठी)१७ जून १ ते ५५० सकाळी ९ वाजता ५५१ ते १२०० दुपारी २ वाजता१८ जून १२०१ ते १८५० सकाळी ९ वाजता १८५१ ते २६०० दुपारी २ वाजता१९ जून २६०१ ते ३२५० सकाळी ९ वाजता ३२५१ ते ४११० दुपारी २ वाजता(केवळ आरक्षित वर्गासाठी)२० जून ४१११ ते ५००० सकाळी ९ वाजता ५००१ ते ६००० दुपारी २ वाजता२१ जून ६००१ ते ७००० सकाळी ९ वाजता ७००१ ते ८०९६ दुपारी २ वाजतासंक्षिप्त वेळापत्रकविभागीय केंद्रांवर पसंतीक्रम अर्ज भरणे- १७ ते २१ जूनपहिल्या फेरीत निवड झालेल्या उमेदवारांची यादी- २५ जूनदुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरणे- तारीख नंतर घोषित होणारदुसऱ्या फेरीत निवड झालेल्या उमेदवारांची यादी- २७ जुलैतिसऱ्या फेरीत निवड झालेल्या उमेदवारांची यादी- १० सप्टेंबर