शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षकांनी जाणून घेतल्या कैद्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2016 05:09 IST

वर्षानुवर्षे तुरुंगाच्या चार भिंतींमध्ये खितपत पडलेल्या कैद्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांनी केला

गणेश वासनिक, अमरावतीवर्षानुवर्षे तुरुंगाच्या चार भिंतींमध्ये खितपत पडलेल्या कैद्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांनी केला. विविध सामाजिक संघटना आणि महिला व बालकल्याण विभागाच्या सहकार्याने सोमवारी अमरावती कारागृहात बंदी सुधार अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला. अधीक्षक ढोले यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या या अभियानामुळे कैद्यांना त्यांच्या व्यथा, वेदना मांडण्याची संधी मिळत आहे. या अभियानांतर्गत सोमवारी पार पडलेल्या कार्यशाळेत कैद्यांना तुरुंग प्रशासनाने पाच विषयांवर बोलते केले. त्यात बंदी समस्या, कारागृह स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, मानसिक रुग्ण असलेल्या कैद्यांचे सर्वोच्च व उच्च न्यायालयात अपील तसेच वैद्यकीय उपचार या विषयांचा समावेश होता. या अभियानात सुमारे ६०० कैद्यांनी सहभाग नोंदविला.कारागृहातील खुल्या पटांगणात कैद्यांना एकत्र आणण्यात आले आणि मनातील व्यथा नि:संकोचपणे मांडा, असे आवाहन ढोले यांनी केले. या वेळी बहुतांश कैद्यांनी नातेवाईकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी महिला-बालकल्याण अधिकारी चवरे, वऱ्हाड संस्थेचे नागदिवे, प्रमोद मेश्राम, अवेअरनेस संस्थेचे अमित शहाळकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव, आदींची उपस्थिती होती.