शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या कामाला खासगी ‘सुरक्षा’ कवच

By admin | Updated: August 23, 2016 02:39 IST

विमानतळ प्रकल्पाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले असले तरी काही मुद्यावरून प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम आहे.

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले असले तरी काही मुद्यावरून प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम आहे. असे असतानाही सिडकोने विमानतळाशी संबंधित प्राथमिक स्वरूपातील विविध कामांना गती दिली आहे. या कामासाठी येणाऱ्या साहित्यांचे संरक्षण करण्यासाठी शस्त्रधारी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.विमानतळ प्रकल्पाच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय स्थलांतर करणार नाही, किंबहुना पुनर्वसन पॅकेजही स्वीकारले जाणार नाही, असा पवित्रा दहा गावातील प्रकल्पबाधितांनी घेतला आहे. परंतु त्यानंतरही सिडकोने विमानतळ प्रकल्पांशी संबंधित विविध प्रकारची स्थापत्यविषयक कामे हाती घेतली आहेत. यात जमिनीचे सपाटीकरण करणे, उलवा टेकडीची उंची कमी करणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी सुमारे १७00 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे. ही कामे विविध ठेकेदारांना विभागून देण्यात आली आहेत. अलीकडेच यापैकी अनेक कामांना सुरुवातही करण्यात आली आहे. या कामांसाठी संबंधित ठेकेदारांकडून प्रकल्पस्थळावर यंत्रसामग्री व इतर साहित्य आणण्यात आले आहे. परंतु स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा संभाव्य विरोध लक्षात घेवून या ठेकेदारांत सुरक्षेच्या विषयावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका हाती घेतलेल्या कामांना बसण्याची शक्यता गृहीत धरून सिडकोने या कामांवर ३४ शस्त्रधारी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. याद्वारे सिडको दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. सिडकोने हे आरोप फेटाळून लावले आहेत. शेकडो कोटींची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यासाठी ठेकेदारांनी कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री व साहित्य कामाच्या जागेवर आणून टाकले आहे. ही यंत्रसामग्री व साहित्यांचे संरक्षण करणे हाच यामागचा एकमेव उद्देश असल्याचा दावा सिडकोच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर संवाद सुरू आहे. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनीही सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>उलवा टेकडीची उंची कमी करणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी सुमारे १७00 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे. ही कामे विविध ठेकेदारांना विभागून देण्यात आली आहेत. अलीकडेच यापैकी अनेक कामांना सुरुवातही करण्यात आली आहे.