शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

खासगी व अभिमतचा मागविला लेखाजोखा

By admin | Updated: August 25, 2016 05:09 IST

वैद्यकीय महाविद्यालयांना प्रवेश शुल्कासह इतर शुल्क व तेथील सोयीसुविधाचा लेखाजोखा वैद्यकीय शिक्षण संचालनालयासमोर मांडावा लागणार आहे.

पुणे : राज्यातील खासगी व अभिमत विद्यापीठांशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयांना प्रवेश शुल्कासह इतर शुल्क व तेथील सोयीसुविधाचा लेखाजोखा वैद्यकीय शिक्षण संचालनालयासमोर मांडावा लागणार आहे. याबाबत विभागाकडून सर्व संबंधित महाविद्यालयांची शुक्रवारी बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीसाठी सर्व माहिती घेऊन येण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य शासनाकडून यावर्षीपासून खासगी व अभिमत विद्यापीठांतील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘नीट’मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. यावर्षी पहिल्यांदाच खासगी व अभिमतची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने राबविली जाणार आहे. राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षामार्फत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही कक्षाकडून प्रसिध्द करण्यात आले आहे. खासगी व अभिमतसाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून पसंती क्रम अर्ज भरून घेतले जाणार आहेत. परंतु सध्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे संबंधित महाविद्यालयांची एकत्रित माहिती उपलब्ध नाही. त्याअनुषंगाने विभागाने येत्या शुक्रवारी मुंबईत सर्व संबंधित महाविद्यालयांची बैठक बोलावली आहे. >३८,२२५ अर्जखासगी व अभिमत विद्यापीठांतील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी एकूण ३८ हजार २२५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये खासगीसाठी २० हजार ५७७ तर अभिमतसाठी १७ हजार ६४८ अर्ज प्राप्त झाले आहेत.विद्यार्थ्यांसाठी दोन्हीसाठी स्वतंत्रपणे अर्ज मागविण्यात आले होते. बुधवारी अर्ज करण्यासाठी अखेरची मुदत होती. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. प्राप्त अर्जांच्याआधारे २७ आॅगस्ट रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. राज्यातील आठ अभिमत विद्यापीठांशी संलग्न १० महाविद्यालयांच्या एमबीबीएसच्या सुमारे १५०० आणि खासगीच्या एमबीबीएसच्या सुमारे १७०० आणि बीडीएसच्या सुमारे ४५० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. निश्चित प्रवेश क्षमता काही दिवसांत संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण