शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत तिढा सुटेल-पृथ्वीराज चव्हाण

By admin | Updated: September 22, 2014 09:37 IST

आघाडीसंदर्भात अजूनही चर्चा सुरूच आहे. असे असले तरी दोन दिवसांत आघाडीचा तिढा सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे दिली.

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. आघाडीसंदर्भात अजूनही चर्चा सुरूच आहे. असे असले तरी दोन दिवसांत आघाडीचा तिढा सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे दिली. जनलोक आणि आधार सामाजिक सेवाभावी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री चव्हाण यांचा आज नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी कराड दक्षिण मतदारसंघातील मुंबई, नवी मुंबईत राहणाऱ्या रहिवाशांचा मेळावाही झाला. आपण दक्षिण कराडमधूनच विधानसभेची निवडणूक लढविणार असून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.मुख्यमंत्री म्हणून गेल्या पावणे चार वर्षात राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. मागील अनेक वर्षांपासून विकासापासून दुर्लक्षित राहिलेल्या दक्षिण कराडसह सातारा जिल्ह्यातील गावागावांचा विकास घडवून आणला. कराडमधून माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. त्यामुळे आमदारकीही येथूनच लढविण्याचा आपण निर्धार केला आहे. त्यामुळे स्वत:ची निवडणूक समजून कामाला लागा, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी) पहिली यादी आजराज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका अद्यापि स्पष्ट झालेली नाही. असे असले तरी उद्यापर्यंत उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.