शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांनी बनविलेल्या ‘एलईडी’ने कारागृहे उजळली

By admin | Updated: October 13, 2016 05:21 IST

मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांमुळे राज्यातील निम्मी कारगृहे उजळून निघाली आहेत. ब्रँडेड कंपन्यांपेक्षाही हे दिवे सरस असल्याने

अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांमुळे राज्यातील निम्मी कारगृहे उजळून निघाली आहेत. ब्रँडेड कंपन्यांपेक्षाही हे दिवे सरस असल्याने मागणी वाढत असून, आता दुसरे युनिटही सुरू करण्यात आले. राज्यातील कारागृहांमध्ये बंदीसुधारणा व पुनर्वसनांंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर वर्धा येथील ‘एमगिरी’च्या पुढाकाराने अमरावती कारागृहात दीड वर्षांपूर्वी एलईडी दिवे निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रारंभी १० बंदीजनांनी एलईडी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. बंदीजनांच्या हातून तयार होणारे हे दिवे ब्रँडेड कंपन्यांना मागे टाकणारे ठरले. परिणामी, राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांनी या दिव्यांचा पुरवठा राज्यभरातील कारागृहांत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यभरातील निम्मी कारागृहे इथल्या कैद्यांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांनी उजळली आहेत. या एलईडी दिव्यांना असणारी वाढती मागणी लक्षात घेऊन, आता दुसरे युनिट निर्माण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंदीजनांनी तयार केलेले विविध साहित्य, वस्तूंचे प्रदर्शन १३ आॅक्टोबर थेट मंत्रालयात भरविले आहे. त्यामध्ये येथील एलईडी दिवेही ठेवले जाणार आहेत. (प्रतिनिधी)