शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये कैद्यांची पोलिसांना मारहाण

By admin | Updated: July 2, 2016 04:32 IST

न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहातून कैदी घेऊन जाणाऱ्या पोलिसांना कैद्यांनीच मारहाण केल्याची घटना शुक्रवारी येथे घडली.

नाशिकरोड : न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहातून कैदी घेऊन जाणाऱ्या पोलिसांना कैद्यांनीच मारहाण केल्याची घटना शुक्रवारी येथे घडली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दुहेरी हत्याकांडातील पाच संशयितांना शुक्रवारी सकाळी पोलीस कैदी पार्टी कारागृहातून न्यायालयीन कामकाजासाठी घेऊन जात असताना गाडीमध्ये बसण्याच्या कारणावरून कैद्यांनी दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केली. सराईत गुन्हेगार अर्जून उर्फ वाट्या महेश आव्हाड व निखिल विलास गवळे यांचा खून करून त्र्यंबकेश्वरच्या तोरंगण घाटात त्यांचे मृतदेह फेकून देण्यात आले होते. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित प्रिन्स चित्रसेन सिंग, सन्नी उर्फ ललित अशोक विठ्ठलकर, निखिल मधुकर निकुंभ, वतन शिवाजी पवार, किशोर सुखदेव गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर नाशिकरोड कारागृहात ठेवण्यात आले होते. नाशिक ग्रामीणची पोलीस कैदी पार्टी या पाच संशयित व इतर गुन्ह्यातील दोघा संशयितांना घेण्यासाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे गेले होते. कारागृहाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यानंतर कैद्यांनी सरकारी गाडी नको, खासगी गाडी मागवा तरच येऊ अशी भूमिका घेतल्याने कैदी पार्टीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयितांनी नाशिक ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव, दीपक कोळी यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत त्यांच्याशी झटापट केली. त्यामध्ये दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे गणवेश फाटले. कैदी पार्टीच्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका करीत कैद्यांना गाडीतूनच नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणले. (प्रतिनिधी)