शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरात डीजेला बंदी

By admin | Updated: September 3, 2014 23:56 IST

गणोश विसर्जन मिरवणुकीत इंदापूर शहर परिसरात डीजेला परवानगी नाकारण्यात आली आहे. गुलालाची उधळण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणोश विसर्जन मिरवणूक : गुलालाची उधळण न करण्याचे आवाहन 
इंदापूर : गणोश विसर्जन मिरवणुकीत इंदापूर शहर परिसरात डीजेला परवानगी नाकारण्यात आली आहे. गुलालाची उधळण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जनाच्या आदल्या दिवशी व विसर्जनादिवशी दारूविक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शहरातील पारंपरिक विसर्जन मिरवणुकीच्या पद्धतीत कसलाही बदल करण्यात आलेला नाही. सकाळी साडेअकरापासून शहरातील नेहरू चौकातून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होईल. प्रत्येक गणोश मंडळाला प्रत्येकी दहा मिनिटांचा अवधी त्या चौकात कलागुण प्रदर्शनासाठी दिला जाईल. रात्री अकरा वाजण्याआधी विसर्जन संपविण्याच्या दृष्टीने कटाक्ष ठेवण्यात आला आहे.
मिरवणुकीकरिता डीजेला, तसेच गुलाल उधळण्यास परवानगी नाकारली आहे. डीजेचा वापर करणा:या मंडळांवर व डीजे संचाच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. वाहने ताब्यात घेऊन ती आरटीओ कार्यालयाकडे पाठवून दिली जातील, याची मंडळांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करून कोंडुभैरी म्हणाले, की गणोशोत्सवाच्या शेवटच्या दोन दिवसांत मद्यविक्रीवर र्निबध घालण्यात आले आहेत. मद्याचा साठा सापडल्यास अगर मद्यविक्री करताना कुणी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.
 
4गणोशोत्सवाच्या काळात व विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनुचित प्रकार घडू नये. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शीघ्रकृती दलाची 15क् जणांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. 
 
4गुलालाऐवजी गुलाब पाकळ्यांची उधळण विसर्जन मिरवणुकीत करावी. नदी प्रदूषणाबाबत काळजी घ्यावी. गणोशस्थापनेपासून शहरात जे शांततेचे वातावरण राहिले आहे. ते कायम ठेवावे, असे आवाहन पो. नि. कोंडुभैरी यांनी केले.