शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी पंतप्रधान अनुकूल

By admin | Updated: November 24, 2014 01:14 IST

भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरुन ‘यू टर्न’ घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. पंतप्रधानांचा वेगळ््या विदर्भाला विरोध नाही. पक्षानेच

नागपूर : भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरुन ‘यू टर्न’ घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. पंतप्रधानांचा वेगळ््या विदर्भाला विरोध नाही. पक्षानेच यासंदर्भात ठराव मान्य केला असून, वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीला पाठिंबा आहे. योग्य वेळी विदर्भ राज्याची निर्मिती होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपुरात ‘वेद’तर्फे (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट) आयोजित ‘पॉलिटिक्स आॅफ डेव्हलपमेंट’ या चर्चासत्रादरम्यान नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी ही माहिती दिली.मोदी यांनी मुंबईसंदर्भात वक्तव्य करताना राज्य तुटू देणार नाही, असे म्हटले होते. वेगळ््या विदर्भाला पंतप्रधानांचा विरोध असल्याचा अपप्रचार होत आहे. मुळात त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. त्यांचा विदर्भाला विरोध नाही. योग्य वेळ येताच राज्याची निर्मिती होईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीसाठी काँग्रेसनेही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आजपर्यंत विदर्भाचा विकास झाला नाही, त्यासाठी येथील नेतेच ७५ टक्के जबाबदार आहेत. नवीन राज्य निर्माण झाल्यावर विकास होईलच, यात पूर्ण तथ्य नाही. त्यासाठी योग्य नेतृत्व, नेतृत्वाला विकास दृष्टी आणि निर्णयक्षमता आवश्यक असते. भाजपने वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीचा ठराव अगोदरच मंजूर केला आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत व त्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे ते म्हणाले. देशात ‘वन मॅन शो’ सुरू नसून लोकशाही पद्धतीनेच निर्णय घेतले जातात, असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.