शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पुजारी तरुण निघाला बैल चोर

By admin | Updated: August 11, 2014 22:50 IST

हनुमान मंदिराचा पुजारी तरुण बैल चोर निघाला असून त्याला पोलिसांनी बोलते करताच त्याने जलंब परिसरातील ४ ते ५ बैलजोड्या लंपास केल्याची कबुली दिली आहे.

जलंब : स्थानिक भोश्री हनुमान मंदिराचा पुजारी तरुण बैल चोर निघाला असून त्याला पोलिसांनी बोलते करताच त्याने जलंब परिसरातील ४ ते ५ बैलजोड्या लंपास केल्याची कबुली दिली आहे. कैलास अग्रवाल यांची बैलजोडी चोरुन ती विकण्याचा प्रयत्न करीत असताना तो रंगेहाथ पकडल्या गेल्यामुळे त्याचे खरे रुप १0 ऑगस्टच्या रात्री उघड झाले.जलंब नजीकच्या भोश्री येथील हनुमान मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून मोहनलाल शर्मा हे पुजारी म्हणून आहेत. त्यांचा मुलगा धर्मेंद्र उर्फ टिक्या हा सुध्दा पुजारी म्हणून काम करतो. ८ ऑगस्टच्या रात्री कैलास ब्रिजमोहन अग्रवाल रा. खेर्डा ह.मु. खामगाव यांच्या खेर्डा शिवारातील गोठय़ातील लाल रंगाची बैलजोडी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. सदर बैलजोडीची किंमत ७0 हजार रुपये आहे. या बैलजोडीच्या शोधासाठी अग्रवाल यांच्याकडून ठिकठिकाणचे गुरांचे बाजार पाहणे सुरु होते. १0 ऑगस्ट रोजी कळंबा कसुरा ता. बाळापूर येथील बाजारात धर्मेंद्र उर्फ टिक्या हा सदर बैलजोडी घेवून आला होता. बैलजोडी ओळखल्यानंतर अग्रवाल यांनी जलंब पोलिसांशी संपर्क साधला व घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच ठाणेदार माकोडे व कर्मचार्‍यांनी कळंबा कसुरा येथे धाव घेतली व धर्मेंद्र उर्फ टिक्याला ताब्यात घेवून त्याला पो.स्टे.ला आणले. दरम्यान या बैल चोरीप्रकरणी धर्मेंद्र उर्फ टिक्या मोहनलाल शर्मा याच्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकाँ. जयपालसिंग मोरे, मिसाळ, उमेश शिरसाट, इंगळे आदी करीत आहेत.