शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘मन की बात’मध्ये अकोल्यातील ‘निसर्गकट्टा’च्या कार्याचा गौरव!

By admin | Updated: August 28, 2016 23:09 IST

पंतप्रधानांनी केले निसर्गकट्टा संस्थेकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन.

अकोला, दि. २८ : पर्यावरणाच्या रक्षणासाठी अकोल्यातील 'निसर्गकट्टा'सारख्या सामाजिक संस्थेकडून प्रेरणा घ्यावी आणि कार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमात केली. यावेळी पंतप्रधानांनी संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोदगारही काढले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. रविवारी पंतप्रधानांनी मन की बातमधून जनतेला आगामी गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करीत नागरिकांनी मातीच्या मूर्तींंना महत्त्व द्यावे, असे सांगत त्यांनी विदर्भातील अकोल्यातील एक पर्यावरणस्नेही निसर्गकट्टा ही संस्था पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटत आहे. गणेशोत्सवात शाडू मातीचे गणपती बनविण्यासाठी आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी या संस्थेचा दरवर्षी पुढाकार असतो, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी निसर्गकट्टा संस्थेच्या कार्याचा गौरव केला आणि या संस्थेकडून प्रेरणा घेऊन पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले.पंतप्रधानांनी अकोल्यातील निसर्गकट्टा संस्थेच्या कार्याची घेतलेली दखल अकोल्यातील नागरिकांसाठी अभिमानास्पद आहे. पंतप्रधानांनी अकोल्यातील एखाद्या संस्थेच्या कार्याची दखल घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. अमोल सावंत, संदीप वाघाडकर यांनी २00५ मध्ये पर्यावरणसंदर्भात जनजागृती करण्यासाठी निसर्गकट्टा सुरू केला. निसर्गकट्टा ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांंसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. निसर्गकट्टा संस्थेशी जिल्हय़ासोबतच शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी जुळलेले आहेत. निसर्गकट्टाच्या माध्यमातून दरवर्षी पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांंसाठी कार्यशाळा घेण्यात येतात. यासोबतच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पक्ष्यांचे रक्षण, पक्ष्यांसाठी घरटी बनवून त्याचे वितरण करणे, प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती आदी उपक्रम सातत्याने निसर्गकट्टातर्फे घेण्यात येतात. निसर्गकट्टाच्या कार्यामुळे अकोलेकर नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव, दुर्गोत्सव साजरा करण्यासंदर्भात जागरूकता निर्माण झाली आहे. पंतप्रधान कार्यालयातील सचिव निसर्गकट्टाशी परिचितपंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले डॉ. श्रीकर परदेशी हे अकोल्यात जिल्हाधिकारी होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अकोल्यात नरनाळा महोत्सव, पर्यावरणपूरक अनेक उपक्रम घेतले. निसर्गकट्टा संस्थेचे कार्य त्यांनी जवळून पाहिले. डॉ. परदेशी यांच्या माध्यमातून निसर्गकट्टाच्या कार्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंंत पोहोचली आणि चक्क पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमादरम्यान निर्सगकट्टाच्या उपक्रमांचे कौतुक केले.