शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य दर घसरूनही डाळींचे दर कडाडलेलेच

By admin | Updated: September 11, 2016 18:47 IST

सात ते आठ महिन्यापूर्वी १६ हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला उडीद आता ७ हजार रुपये अर्थात अर्ध्याहून कमी दरातही खपेनासा झाला आहे.

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. ११ : मागील काही दिवसांपासून नव्या धान्याची आवक सुरू झाल्यानंतर तूर, मुग आणि उडीद या कडधान्याचे दर दिवसेंदिवस घसरत असतानाही बाजारात डाळींचे दर मात्र कडाडलेलेच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची चांगलीच गळचेपी होत असल्याचे दिसत आहे.खरीप हंगामातील मूग आणि उडीद ही पिके कमी दिवसांची असल्यामुळे बाजारात या पिकांच्या धान्याची आवक मागील १५ दिवसांपासून सुरू झालेली आहे. या कडधान्याची आवक सुरू होण्यापूर्वीच धान्य बाजारात विविध धान्याचे दर कोसळणे सुरू झाले होते. यामध्ये प्रामुख्याने तूर, मुग आणि उडीद या कडधान्याचा समावेश आह. सात ते आठ महिन्यापूर्वी १६ हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला उडीद आता ७ हजार रुपये अर्थात अर्ध्याहून कमी दरातही खपेनासा झाला आहे.

जवळपास १५ हजार रुपये असलेली तूर आता ६ ते साडे सहा हजार रुपये प्रतिक्विंटलही खपेनासी झाली आहे. त्याशिवाय ८ ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटल खपणारा मूग आता पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आत खपत आहे. आता कडधान्याचे भाव अर्ध्यावर आले असताना डाळींचे दर मात्र कमी झालेले नाहीत. जिल्ह्यातील बाजारातून घेतलेल्या आकडेवारीनुसार मूग डाळ ९० ते १०० रुपये प्रति किलो, उडीद डाळ १२० ते १३० रुपये प्रति किलो आणि तुरीची डाळही ११० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. त्यावरून बाजार व्यवस्था सर्वसाधारण  जनतेची लूट करीत असल्याचे स्पष्ट होत असून, शासनाने याची दखल घेणे आवश्यक आहे.