शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: October 16, 2014 04:24 IST

गेल्या १५ दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या सर्वाधिक सभा झाल्या. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आघाडीवर आहेत.

गेल्या १५ दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या सर्वाधिक सभा झाल्या. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आघाडीवर आहेत. इतर प्रमुख नेते स्वत:च उमेदवार असल्याने त्यांना आपला मतदार संघ साभांळत इतर उमेदवारांसाठी प्रचार करावा लागला. पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी पूर्व विदर्भात तीन तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दोन सभा घेत निवडणुकीच्या आखाड्यात रंगत आणली. नागपुरातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणीस, काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत , सतीश चतुर्वेदी , अनिस अहमद , सुबोध मोहिते , राजेंद्र मुळक , अनिल देशमुख, रमेश बंग, चंद्रपूर जिल्'ातून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, माजी राज्य मंत्री विजय वडेट्टीवार, संजय देवतळे तर गडचिरोलीतून राष्ट्रवादीचे माजी मंत्री धर्मरावबाब आत्राम या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नागपुरातील पश्चिम नागपूर मतदार संघात काँग्रेसचे विकास ठाकरे आणि भाजपचे सुधाकर देशमुख तुल्यबळ लढत झाली. उत्तर नागपुरात माजी मंत्री नितीन राऊत आणि भाजपचे डॉ मिलींद माने यांच्यात काट्याची टक्कर झाली. जिल्यातील काटोल मतदार संघात काका- पुतणे अनिल आणि आशिष देशमुख यांच्यातील सामना राज्यात चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे, या लढाईत आशिष देशमुख यांचे वडील आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटस्थ राजेन्द्र मुळक यांना अखेरपर्यंत नागपूर शहरात मतदार संघ मिळाला नाही. परिणामी त्यांनी जिल्'ातील कामठी मतदार संघातून निवडणूक लढविली. तेथेही त्यांना भाजपचे हेवीवेट उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टक्कर दिली. चंद्रपूर जिल्'ात काँग्रेसचे माजी कॅबिनेट मंत्री संजय देवतळे यांनी तिकीट कापल्याने त्यांनी अवघ्या काही तासांतच भाजपात प्रवेश करीत वरोरा मतदार संघातून आपली उमेदवारी ससादर केली. येथे त्यांचा सामना त्यांची वहिणी आसावरी देवतळे यांच्याशी झाला. काँग्रेसने यंदा त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दीर- भावजयाच्या या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपा स्ष्ट बहुमताचा दावा करीत असली तरी पूर्व विदर्भात काँग्रेसची पकड अजूनही पक्की आहे. यंदा तर युतीत सोडचिठ्ठी आणि आघाडीत बिघाडी झाल्याने मतांचे विभाजन अटळ आहे. शिवाय बंडोबांमुळे राजकीय समीकरणेच बदलली. परिणामी या भागातून कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील हे १९ आॅक्टोबर रोजी कळणार.अमरावतीत माजी राष्ट्रपतीपुत्र काँग्रेसचे रावसाहेब शेखावतविरुद्ध भाजपचे सुनील देशमुख, बडनेऱ्यात शिवसेनेचे संजय बंड, काँग्रेसच्या सुलभा खोडके आणि अपक्ष रवी राणा, तिवस्यात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, भाजपच्या निवेदिता दिघडे आणि शिवसेनेचे नाना वानखेडे असा तिहेरी सामना रंगला. अमरावतीतील मुस्लिम भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. वर्धा जिल्ह््यातील देवळी मतदारसंघात काँग्रेसचे रणजित कांबळे, माजी खासदार भाजपचे सुरेश वाघमारे आणि बसपाचे उमेश म्हैसकर असा सामना रंगला. आर्वीमध्ये काँग्रेसचे अमर काळेविरुद्ध भाजपचे दादाराव केचे अशी थेट लढत झाली. हिंगणघाटमध्ये भाजपचे समिर कुणावार, राष्ट्रवादीचे राजू तिमांडे आणि शिवसेनेचे अशोक शिंदे असा तिरंगी डाव रंगला. वर्धेत अंदाज न येणारी लढत झाली. राष्ट्रवादीचे सुरेश देशमुख, भाजपचे पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, शिवसेनेचे रविकांत बालपांडे आणि बसपाचे निरज गुजर हे रिंगणात होते. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे प्रचंड औत्सुक्याचा विषय ठरलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत, पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांपैकी बुलडाणा जिल्ह्यात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला, तर अकोला व वाशिम जिल्ह्यात संमिश्र स्वरुपाचा प्रतिसाद मिळाला. बुधवारी पार पडलेल्या मतदानाच्या प्रारंभिक आकडेवारीनुसार, पश्चिम वऱ्हाडातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी, बुधवारी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. पश्चिम वऱ्हाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, अकोला, वाशिम व बुलडाणा या विदर्भातील तीन जिल्ह्यांमधील एकूण १५ विधानसभा मतदारसंघांमधील एकूण २५१ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला बुधवारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बंद झाला. प्रारंभिक आकडेवारीनुसार, अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी ५९ टक्के, वाशिम जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये सरासरी ६२.३३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये सरासरी ६७ टक्के मतदानाची नोंद झाली. याआधीच्या, म्हणजे २००९ मधील विधानसभा निवडणुकीत, अकोला जिल्ह्यात सरासरी ५४.४१ टक्के, वाशिम जिल्ह्यात सरासरी ६१.१८ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ६६.१६ टक्के मतदान झाले होते. मतदानास प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांमध्ये मतदान संथ गतीने झाले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ६० पर्यंत तरी पोहचेल की नाही, अशी शंका वाटायला लागली होती; मात्र दुपारी तीन वाजतानंतर मतदानाने वेग घेतला. अखेरच्या तासात तर अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या दिसल्या. काही ठिकाणी सायंकाळी सहा वाजतापूर्वी मतदान केंद्राच्या आवारात प्रवेश केलेल्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, मतदानाची वेळ संपल्यानंतरही बराच काळ मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी हाती येण्यासही बराच विलंब झाला. जीव नकोसा करणाऱ्या ‘आॅक्टोबर हिट’चा मतदानावर परिणाम होईल, अशी आशंका व्यक्त केली जात असताना, हुडहुड चक्रीवादळाच्या परिणामी, काही भागांमध्ये बुधवारी सकाळपासून, आकाश ढगाळलेले होते आणि काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरीही लावली. त्यामुळे उकाडा कमी झाल्यानेही मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली. प्रथमच मतदानाचा हक्क बजावित असलेल्या नवमतदारांमध्ये, विशेषत: युवतींमध्ये, बराच उत्साह दिसून आला. मुस्लिम व दलितबहुल वस्त्यांमध्ये मतदानाचे प्रमाण जास्त होते. त्याचप्रमाणे महिला वर्गातही दुपारनंतर उत्साह दिसला. चाकरमान्यांनी मात्र फारसा उत्साह दाखविला नाही. अकोला व वाशिम जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात मतदारांचा उत्साह जास्त जाणवला. पश्चिम वऱ्हाडात एकूण १६३ संवेदनशील, ३५ अतिसंवेदनशील व ११ उपद्रवी मतदान केंद्रे असली तरी, सुदैवाने काही किरकोळ वाद वगळता, कुठेही कोणत्याही प्रकारची मोठी अनुचित घटना घडली नाही. तीनही जिल्ह्यांमधील काही गावांमधील गावकऱ्यांनी, त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता; मात्र प्रत्यक्षात वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील जनुना आणि अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा व बाभुळगाव ही गावे वगळता, उर्वरित सर्व गावातील गावकऱ्यांनी बहिष्काराचे अस्त्र म्यान केले. प्रशासनाने लाख प्रयत्न करूनही या तीन गावांमधील गावकरी मात्र बहिष्काराच्या निर्णयावर ठामच राहिले.