शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव

By admin | Updated: November 27, 2015 02:56 IST

विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, असा दबाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपा आणि मित्र पक्षांकडून येत आहे.

मुंबई : विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, असा दबाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपा आणि मित्र पक्षांकडून येत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अद्याप विस्ताराचा मुहूर्त ठरविलेला नाही. सूत्रांनी सांगितले, भाजपाच्या ज्येष्ठ मंत्र्यांची काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. त्यातही विस्ताराचा आग्रह धरण्यात आला. विशेषत: प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील हे विस्तारासाठी आग्रही आहेत. अधिवेशनापूर्वी विस्तार करावा आणि अधिवेशनानंतर लगेच महामंडळांवरील नियुक्ती कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी तारीख जाहीर केली नसली तरी दानवे आणि पाटील यांनी ३० नोव्हेंबरपूर्वी विस्तार होणार असे जाहीर केले होते. त्यामुळे विस्ताराबाबत अजूनही संभ्रम आहे. खा. राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), आ. महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष) आणि आ. विनायक मेटे (शिवसंग्राम) मंत्रिपदासाठी आतुर आहेत. तर खा. रामदास आठवले (रिपाइं) यांना केंद्र आणि राज्यात मंत्रिपद हवे आहे. एकूण १२ मंत्रिपदे रिक्त आहेत. त्यात दोन शिवसेनेच्या वाट्याला जातील. मित्रपक्षांना भाजपा दोन किंवा तीन मंत्रिपदे देऊ शकते. ७ ते ८ मंत्रिपदे ही भाजपाच्या वाट्याला येतील. त्यातील दोन रिक्त ठेवण्यात येणार आहेत. याचा अर्थ भाजपाकडून ५ ते ६ जणांना संधी दिली जाईल. ती ठरविताना मुख्यमंत्री फडणवीस यांची कसरत होऊ शकते. (विशेष प्रतिनिधी)