शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

लाखो भाविकांच्या उपस्थितीत माहूरला नवरात्रोत्सवाची समाप्ती

By admin | Updated: October 11, 2016 15:14 IST

लाखो भाविक-भक्तांच्या उपस्थितीत ध्वजपूजन, शस्त्रपूजन, भगवान परशुरामांच्या पालखीद्वारे सीमोल्लंघन करून महाप्रसाद वाटपानंतर माहुरातील नवरात्र महोत्सवाची विधीवत सांगता मंगळवारी झाली़

ऑनलाइन लोकमतश्रीक्षेत्र माहूर, दि. ११ -   लाखो भाविक-भक्तांच्या उपस्थितीत ध्वजपूजन, शस्त्रपूजन, भगवान परशुरामांच्या पालखीद्वारे सीमोल्लंघन करून महाप्रसाद वाटपानंतर माहुरातील नवरात्र महोत्सवाची विधीवत सांगता मंगळवारी झाली़१ आॅक्टोबरपासून माहूरच्या रेणुकामाता मंदिरात आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवात ११ दिवस भाविकांना अलंकारासह दररोज नवीन रंगाच्या पैठणी, महावस्त्रांसह देवीचे दर्शन घेता आले़ घटस्थापना, महापूजा, महाआरती, महाप्रसाद, दुर्गा सप्त शतचंडी पाठ, छबिना मिरवणूक, भजन, पंचपदी, गायन, पायस नैवेद्य, कुमारीका पूजन, सुहासिनी पूजन, परिवार देवता पूजन, महाकाली माता पूजन, शतचंडी महायज्ञ, देवता स्थापन, भगवान परशुरामांची पालखी, सीमोल्लंघन, महाप्रसाद आदी कार्यक्रम माहुरात पार पडले़नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी विश्वस्त समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलिस अधिकारी रमाकांत खरात, सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ़राजेंद्र भारूड, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या उपस्थितीत विश्वस्त तथा पुजारी भवानीदास भोपी, चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, समीर भोपी, विनायकराव फांदाडे, श्रीपाद भोपी, आशिष जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ध्वजपूजन, रेणुका मातेची महापूजा, महाआरती केल्यानंतर केशरी पिवळ्या रंगाचे महावस्त्र चढवून शेवटची माळ चढविण्यात आली़ दुपारी श्री भगवान परशुरामांची पालखी काढण्यात येवून सीमोल्लंघन, आरती झाल्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला़ नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांना त्रास होवून नये यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, पोलिस अधीक्षक संजय येनपुरे यांनी दोनवेळा माहूरला भेटी देवून आढावा घेतला़ उपविभागीय पोलिस अधिकारी अविनाश बारगळ उत्सव संपेपर्यंत माहुरात तळ ठोकून होते़ रेणुकादेवी संस्थानच्या विश्वस्त समितीने दर्जेदार सुविधा दिल्याने सुखदायक दर्शन होवून भाविक समाधानी झाले़