शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांसाठी पाणीसाठे तयार करा

By admin | Updated: March 6, 2017 01:29 IST

उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे

अकोले : सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे अकोले वनक्षेत्रात असणाऱ्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पाणीसाठे तयार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अकोले परिसरात लागूनच भादलवाडी, पोंधवडी या गावांमध्ये वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात ९०.६७ हेक्टर इतके क्षेत्र आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या आहे. अनेक प्रकारचे प्राणी, हरीण, कोल्हे, लांडगे, ससे, मुंगूस, खोकड इत्यादी वास्तव्यास आहेत. हे प्राणी उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात भटकत असतात. सध्या अकोले परिसरातील पाण्याचे साठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे प्राणी पाण्याच्या शोधात भटकत असताना वाहनांना धडकून अपघात होऊन मृत्युमुखी पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वेळीच पाण्याची व्यवस्था केल्यावर प्राण्यांना मोकळ्या जागी भटकण्याची गरज पडणार नाही. (वार्ताहर)सध्या वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची ठिकाणे कोरडी पडली आहेत. या वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय वनखात्याने करणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शामराव पाटील यांनी वनविभागाकडे केली आहे. गेल्या वर्षी भिगवण येथील रोटरी क्लब या सामाजिक संस्थेने वन्यप्राण्यांना पाणी देण्यासाठी पाण्याच्या साठवणुकीची व्यवस्था चांगल्याप्रकारे केली होती. त्यामुळे गेल्या उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्याची सोय उत्तमप्रकारे झाली होती. मात्र, या वर्षी उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी इतरत्र भटकत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी सगळ्या स्तरातून होत आहे.याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले, की वन्यप्राण्यांना पाणी देण्यासाठी भिगवण येथे कार्यरत असणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल, तसा अहवाल मागवून कार्यवाही करण्यात येईल.अकोले परिसरातील वनक्षेत्रात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पाणीसाठे तयार करण्याची मागणी होत आहे.