शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात!

By admin | Updated: December 25, 2015 03:10 IST

शेतक-यांचे विविध प्रयोग राहतील प्रदर्शनाचे आकर्षण.

अकोला : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त येत्या २७ ते २९ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अँग्रोटेक-२0१५ चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतावर केलेले प्रयोग या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण राहील. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत होत असलेल्या या कृषी प्रदर्शनाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ३00 च्यावर गाळे उभारण्यात आले असून, यात विविध कृषी तंत्रज्ञान, नवे संशोधन माहिती शेतकर्‍यांसाठी ठेवण्यात येत आहे. अलीकडच्या काही वर्षात पावसाची अनियमितता वाढली आहे. या पृष्ठभूमीवर पाण्याची बचत आणि संबंधित तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज असल्याने प्रदर्शनात याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनांतर्गत कृषी विद्यापीठे, शासकीय संस्था, तसेच कृषी क्षेत्रात आधुनिक उत्पादने निर्मिती करणार्‍या खासगी कंपन्या, प्रगत उत्पादने आणि यंत्राचे सादरीकरण, पाणी, खते आणि कीटकनाशक ांचा कमीतकमी वापर करू न भरपूर उत्पादने मिळवण्यासाठीचे तंत्रज्ञान या ठिकाणी शेतकर्‍यांसाठी मांडले जाणार आहे. या प्रदर्शनात कृषी विद्यापीठ व संलग्न कृषी संस्थांची दालने तसेच कृषी विभाग, कृषी अवजारे व उत्पादने, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विकास, ग्रामीण व्यवसाय, कृषी व ग्रामीण उद्योग आदी दालनांसह कृषी व कृषी संलग्नित योजनांची माहिती, फळ व भाजीपाला प्रदर्शन यासह बचत गटांचा सहभाग व विद्यापीठांच्या प्रकाशनाची रेलचेल येथे असेल. शेतकरी फूलशेतीकडे वळल्याने फूलशेती व वनौषधीबाबतची माहिती येथे उपलब्ध असेल. कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास ऊस, कृषी अभियांत्रिकी विभागाची उत्पादने येथे ठेवली जाणार आहेत.