शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोसंदर्भात महिन्याभरात बृहतआराखडा तयार करणार- मुख्यमंत्री

By admin | Updated: May 7, 2017 18:08 IST

कचराकोंडी सोडवण्यासाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 7 - शहरातील कचराकोंडी सोडवण्यासाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात कचरा डेपोसंदर्भात बृहतआराखडा तयार करून या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. 

गेली अनेक वर्षे सातत्याने उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावातील ग्रामस्थ कचरा प्रश्नावर आंदोलन करीत आहेत. हा प्रश्न अधिकच जटील झाला आहे. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी त्यांचा आक्रोश मांडला. या बैठकीमध्ये त्यांच्या मागण्यांविषयी चर्चा करण्यात आली. शहरामध्ये विकेंद्रीकरणाद्वारे कचरा जिरवण्यावर आगामी काळात भर देण्यात येणार आहे. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार करून दीर्घकालीन उपाय करण्यात येईल. भराव भूमी आणि क्षेपण भूमीचे कॅपिंग करून घेणार आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलनावेळी ग्रामस्थांच्या मुलांना कंत्राटी पद्धतीने नोक-या देण्यात आल्या होत्या. त्यांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यासोबतच कचरा डेपोसाठी ज्या ग्रामस्थांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या, त्या जमिनी परत देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अधिग्रहीत केलेल्या जमिनी परत करता येत नाहीत. त्यातील काही भाग देता येईल का यावर चर्चा सुरू आहे. उरुळी आणि फुरसुंगी गावाचे पाणी, दवाखाना, रखडलेला विकास असे स्वतंत्र प्रश्न आहेत. त्यासाठी कालबद्ध बृहत आराखडा करून तो ग्रामस्थांसमोर मांडण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.पुणे महापालिका आणि शासन मिळून महिन्याभरात 25 ते 40 वर्षांपर्यंत हा प्रश्न मिटेल, असा आराखडा तयार करण्यात येणार आहे. बैठकीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी सकारात्मक भूमिका घेऊन या आराखड्यामध्ये सहभाग नोंदवण्याची तयारी दर्शवली असून ही समस्या सोडवणे ही शासनाची जबाबदारी असून ती आव्हान म्हणून स्वीकारल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कचरा प्रश्नासाठी गेल्या आठ वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. सत्ताबदल आताच झालेला आहे, तरीही कोणाची सत्ता या वादात न पडता आंतरराष्ट्रीय होत चाललेल्या पुण्याच्या इभ्रतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे आव्हान स्वीकारल्याचे ते म्हणाले.