शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

आगारांचा होणार कायापालट

By admin | Updated: February 14, 2015 04:15 IST

बकालपणा आलेल्या एसटी आगारांचा कायापालट करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस

मुंबई : बकालपणा आलेल्या एसटी आगारांचा कायापालट करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्वच्छता अभियानात एसटी कर्मचाऱ्यांचा सहभाग निश्चित असून, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. राज्यात एसटीचे २५0 आगार आहेत. या आगारात मात्र प्रवाशांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. ठिकठिकाणी असलेला कचरा, पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय, कँटीनमध्ये खाद्यपदार्थांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे प्रवाशांना एसटीचा प्रवास आणि त्यांच्या सुविधा नकोशा होतात. त्याचप्रमाणे एसटीला नवीन आगारांची संकल्पना राबविणे सध्या तरी शक्य नाही. या सर्व कारणांमुळे एसटी आगारांमध्ये १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. या अभियानातंर्गत आगार आणि बसस्थानकांत सफाई, प्रसाधनगृहांची स्वच्छता, कचराकुंड्या बसविणे, झाडे लावणे इत्यादी उपक्रम राबविले जातील. ही योजना कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न असेल, असे रावते म्हणाले. या कामासाठी मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांकडून मदत केली जाणार आहे. तसेच शिवसेनेतर्फे सर्व जिल्हाप्रमुखानांही या अभियानात सहभागी होण्याच्या सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)