शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये आईनेच केला गर्भवती मुलीचा खून

By admin | Updated: July 16, 2016 14:18 IST

प्रेम संबंधातून गर्भवती झालेल्या मुलीच गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्येचा कांगावा करणा-या आईला पोलिसांनी अटक केली.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १६ -  प्रेम संबंधातून गर्भवती झालेल्या मुलीच गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्येचा कांगावा करणा-या आईला पोलिसांनी अटक केली. वाडी येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.   
मुक्ताबाई समाधान मेश्राम (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. तिची मुलगी अंकिता हिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्या तरुणाशी शरिरसंबंध प्रस्थापित झाल्याने तिला गर्भधारणा झाली. मुक्ताबाईला हे माहित पडल्याने तिने अंकिताला त्याबाबत खोदून खोदून विचारले. अंकिता उडवाउडवीची उत्तरे देत होती. बदनामीच्या धाकापोटी मुक्ताबाईने तिला गर्भपात करण्याची विनंती केली. अंकिताने त्याला विरोध केला. त्यामुळे १३ जुलैच्या मध्यरात्री मायलेकीत कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात मुक्ताबाईने अंकिताचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला. १४ जुलैला अंकिताचे शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांनी गळफास नव्हे तर गळा आवळल्याचा निष्कर्ष अहवालातून व्यक्त केला. त्यामुळे अंकिताच्या कुटुंबीयांना वाडी पोलिसांनी विचारपूस केली. 
प्रारंभी असंबंध उत्तरे देणारी मुक्ताबाई पोलिसांच्या चौकशीत जास्त वेळ लपवाछपवी करू शकली नाही. तिने शुक्रवारी रात्री अंकिताच्या खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.