शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला दोनदा गर्भपाताला भाग पाडणा-या प्रियकराला अटक

By admin | Updated: February 20, 2017 16:31 IST

लग्नाचे स्वप्न दाखवून तरुणीशी शरीरसंबंध ठेवून नंतर तिची फसवणूक करणा-या 28 वर्षीय युवकाला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 20 - लग्नाचे स्वप्न दाखवून तरुणीशी शरीरसंबंध ठेवून नंतर तिची फसवणूक करणा-या 28 वर्षीय युवकाला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. पीडित तरुणी या युवकापासून दोनवेळा गर्भवती राहिली. त्याने तिला गर्भपात करण्यासही भाग पाडले. व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी जेव्हा तरुणीने फिनाईल पिऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि तरुणी 2013 मध्ये भेटले. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. दोघांमधील प्रेमाची जवळीक शरीरसंबंधांमध्ये बदलली. आरोपीने लग्नाचे स्वप्न दाखवून  तरुणीबरोबर अनेकवेळा शरीरसंबंध ठेवले. 2016 मध्ये ही युवती तरुणापासून गर्भवती राहिल्यानंतर त्याने गर्भपात केंद्रामध्ये नेऊन तिला गर्भपात करायला भाग पाडले. 
 
त्यानंतर त्याने तिच्या आई-वडिलांची भेट घेतली. ती सुद्धा त्याच्या आई-वडिलांना जाऊन भेटली. पण दोघांच्याही कुटुंबियांना त्यांच्यामध्ये शरीरसंबंधांवरुन काय घडले आहे याची कल्पना नव्हती. त्यानंतर तरुणीला युवकाचे आणखी एका महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. 
 
पण युवकाने लग्नाचे आश्वासन दिल्याने वाद मिटला. 2017 मध्ये पीडित तरुणी पुन्हा गर्भवती राहिली. त्यावेळी प्रियकराचा फोन तपासताना त्याचे आणखी एका ठिकाणी प्रेमसंबंध असल्याचे तिला समजले. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद झाला. तिने लग्नाचा विषय काढला तेव्हा त्याने साफ नकार दिला. 
 
व्ह‌ॅलेंटाईन्स डे च्या दिवशी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले आणि हा सारा प्रकार उजेडात आला. या घटनेची पोलिस तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.